प्रतिनिधी रामेश्वर वाढी
अकोला : – सर्वोपचार शासकीय रुग्णालयात रुग्णांना प्लेट्स लेट मिळत नाही गोरगरिब रुग्णांना पैसे खर्च करून खासगी रक्तपेढीतुन रक्त व प्लेट्स लेट आणावे लागतात याकरीता महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने रक्तपेढीची पाहणी केली असता रक्तपेढीतील प्लेट्स लेट बनवायची मशिन गेल्या एका महिन्यांपासून बंद आहे असे दिसून आले संबंधित अधिकारी यांना विचारले असता लवकरात लवकर मशिन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत असे सांगितले महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे व जिल्हा महासचिव समिर खान यांनी त्यांना आठ दिवसांचा कालावधी दिला आहे आठ दिवसांत जर प्लेट्स लेट बनवायची मशिन सुरू झाली नाही तर महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना तिव्र आंदोलन छेडेल असा इशारा दिला यावेळी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे, जिल्हा महासचिव समिर खान, जिल्हा सहसचिव सतिश तेलगोटे, उमेश शेजे,सुरज खंडारे आदी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना पदाधिकारी उपस्थित होते
Users Today : 20