बेलुरा येथील सरपंच राम मंगळे यांचे २१ ला अकोट आमरण उपोषणाला सुरुवात अकोट प्रतिनिधी विशाल गवई अकोट तालुक्यामधील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या संपूर्ण परिसरामध्ये गेल्या १० ते११ तारखेला झालेल्या सदृश्यमय ढगफुटीच्या अस्मानी संकटाने थैमान घातले होते, यावेळी परिसरातील संपूर्ण शेतकरी तसेच मजूर वर्ग हवालदील झाला होता. त्यांना झालेल्या संकटात सावरण्यासाठी मंगळ यांनी अतिवृष्टीने झालेल्या महापुराने त्यांच्या राहत्या घरामधील दैनंदिन साहित्य धान्य सर्व घरामधील साहित्य पाणी घरामध्ये शिरल्याने वाहून गेले होते.यावेळी त्यांना गावाचा कर्तव्यदक्ष सरपंच म्हणून नागरिकांसाठी त्यांनी जेवणाची फराळाची सतत दोन दिवस व्यवस्था केली. एवढे होऊन सुद्धा मजूर वर्ग बेघर झाले शासनापर्यंत मोठी घटना घडवून सुद्धा या गावाला कुठल्याच लोकनियुक्त आमदार खासदार पालकमंत्री व तसेच जिल्हाधिकारी इथल्या कुठल्याच संबंधित अधिकाऱ्यांनी भेट दिली, नाही या झालेल्या सर्व परिसरातील शेतकऱ्यांना व मजूर वर्गांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळावा त्यासाठी पालकमंत्री अकोला, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला अकोट दंडाधिकारी तसेच तहसीलदार निलेश मडके पंचायत समिती कार्यालय अकोट ठाणेदार आकोट शहर पोलीस स्टेशन अकोटला यावेळी प्रतिलिपी तक्रार दाखल करून उपोषणाला शुक्रवार १०-२०-२२ रोजी पासून आमरण उपोषण छत्रपती शिवाजी महाराज चौक आकोट येथे सुरू करण्यात येणार आहे .
सातपुडा च्या पायथ्याशी असलेले उमरा, बेलुरा, जितापुर माऊली, मकरमपूर, शिवपूर, शहापूर, बोर्डी ,लाळेगाव, खैरखेड, पिंपरी बुद्रुक, पिंपरी जैनपूर ,एदलापूर, बोरचड, भिल, जितापूर सातपुड्याच्या हिरव्यागार पिकाचे व त्याचे नव्हते होऊन मातीमोल झाले, सरसगट झालेल्या नुकसानीचे भरपाई शेतकऱ्यांना व मजूर वर्गांना दिवाळीपूर्वीच तात्काळ मिळावी त्यांची दिवाळी अंधारमय न होता. प्रकाशमय व्हावी व त्यांना ढगफुटी मुळे झालेल्या संकटाला सावरण्यासाठीअकोला प्रहार जिल्हा कोषाध्यक्ष संघटनेच्या अंतर्गत शुक्रवार दिनांक २१- १०- २०२२ रोजी सकाळी १० वाजता पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमरण उपोषणाला बसणार आहे. यावेळी समस्त प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व झालेल्या परिसरातील सर्व शेतकरी व मजूर वर्गांना हजर राहण्याचे आवाहन केलेले आहे.
Users Today : 20