प्रतिनिधी -प्रा. भरत चव्हाण
नंदुरबार : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) मंडळाच्या स्थलांतरीत कार्यालयाचे उद्घाटन आज जिल्हा न्यायधीश न्या.आर.जी.मलशेट्टी यांच्या हस्ते संपन्न झाले.
महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालय,जिल्हा परिषद शेजारी झालेल्या या कार्यक्रमास वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश न्या. एस.टी.मलीये, मुख्य न्यायंदडाधिकारी न्या.व्ही.जी.चव्हाण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी.व्ही.हरणे, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्या. व्ही.एन. मोरे, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्या.व्ही.एन.गायकवाड, बाल न्याय मंडळाचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्या.श्रीमती.वाय.के.राऊत, दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्या.एन.बी.पाटील, तिसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्या.ए.एस.कुळकर्णी, चौथे प्रथम वर्ग न्या.एस.डी.मोरे, पाचवे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्या.श्रीमती. प्रियंका काजळे, बाल न्याय मंडळाचे सदस्य नितीन सनेर, श्रीमती.ज्योती कळवणकर, प्रबंधक जिल्हा न्यायालय श्री.जोशी, महिला आर्थिक विकास महामडळाचे जिल्हा वरिष्ठ समन्वयक श्रीमती. कांता मिश्रा, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रा.वा.बिरारी, जिल्हा परिविक्षा अधिकारी जी.ए.जाधव, परिविक्षा अधिकारी व्ही.एन.लोखंडे, एस.एम.पवार, बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड.प्रशांत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलतांना न्या.श्री.मलशेट्टी म्हणाले की, बालकांच्या क्षेत्रात काम करतांना बाल न्याय मंडळ व बाल कल्याण समिती, पोलीस ,आरोग्य विभाग तसेच महिला बाल विकास विभागाचा समन्वय चांगला असून येथील बाल कल्याण समितीचे काम खूप चांगले असल्याचे सांगितले. बाल कल्याण समितीचे संदर्भात नागरिकांना माहिती व्हावी यासाठी प्रसार व प्रसिद्धी करावी असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात बोलतांना न्या.श्री. चव्हाण म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यात बाल न्याय (मुलांची काळजी व सरंक्षण ) अधिनियम 2015 मधील तरतुदीनुसार विधी संघर्षित बालके, बालिका यांचे प्रकरणे बाल न्याय मंडळामार्फत हाताळली जात असून बाल न्याय मंडळाचे कामकाज यापूर्वी श्रीयाद मुलींचे निरीक्षणगृह,जगतापवाडी, नंदुरबार येथे केले जात होते. तेथे बाल न्याय मंडळाच्या कामकाज करतांना प्रशासकीय अडचणी येत होत्या. त्यामुळे हे कार्यालय आता महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालय,जिल्हा परिषद शेजारी, टोकरतलाव रोड,नंदुरबार येथे स्थलांतरीत झाल्यामुळे विधी संघर्षग्रस्त बालकांच्या हिताच्या दृष्टीने, न्यायिक विभाग,पोलीस विभाग, शासकीय रुग्णालय तसेच महिला व बाल विकास विभाग या सर्व यंत्रणाचे कार्यालय जवळ असल्याने येथील कामकाजाला अधिक गती येईल. या ठिकाणी बाल न्याय मंडळाचे कामकाज प्रत्येक आठवड्याच्या गुरुवार, शुक्रवार आणि पहिला व तिसरा शनिवारी सुरु राहील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.जाधव तर आभार प्रदर्शन श्री.बिरारी यांनी केले.
यावेळी पोलीस निरीक्षक राहुल पवार,विकास गुंजाळ, प्रशांत राठोड, पो.कॉ.गिरीष पाटील, ॲड.हेमंत गागुर्डे, ॲड. शारदा पवार, ॲड. यु.एस.केदार, ॲड.अझहर पठाण, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी गौतम वाघ,गौरव पाटील, रेणूका मोघे महिला बाल विकास व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.