चिखली : परतीच्या पावसाने बुलडाणा जिल्ह्यात हाहाकार माजविला आहे. गत पंधरा दिवसांपासून सतत आणि संतत धार पावसाने अतोनात नुकसान झालेले आहे. तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असला तरी शिंदे फडणवीस सरकार हे संवेदनशिल सरकार असल्याने अस्मानी संकटात युतीचे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाईपोटी आर्थिक मदत देईल असे प्रतिपादन करून आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी कोलारा, गांगलगाव या गावातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन दिलासा दिला.
दि 20/10/2022 रोजी आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने कोलारा, गांगलगाव या गावात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
आज मतदारसंघातील गांगलगाव , कोलारा या भागात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून सरसगट पंचनामे करून सरसकट मदत देण्याची मागणी सुद्धा केली . यावेळी नायब तहसीलदार डॉ मुढे साहेब, तालुका कृषि अधिकारी अमोल शिंदे , साहेबराव पाटील, सौ निताताई सोळंकी तालुका अध्यक्ष भाजप महीला किसान आघाडी,गजेंद्र म्हस्के तालुका उपाध्यक्ष युवा मोर्चा भाजपा,बृहस्पती म्हस्के, शेषराव सावळे, गजानन म्हस्के, सरपंच गणेश म्हस्के, भगवान् सोळंकी, रमेश सोळंकी, अंनथा सोळंकी,उध्दव पवार,
राजेंद्र म्हस्के,गणेश म्हस्के,नितीन म्हस्के,उत्तमराव शेळके,गणेश शेळके,अनिल पाटील,साहेबराव सावळे,दत्तात्रय गायकवाड,अनिल म्हस्के,विष्णू म्हस्के,फकिरबा म्हस्के,चेतन भानुसे,अक्षय सावळे,गजानन म्हस्के,गणेश म्हस्के,जमदार म्हस्के,समाधान म्हस्के,अमोल भानुसे,पुरूषोत्तम म्हस्के,सतीश सावळे,गजानन सावळे,रमेश म्हस्के,वसंतराव म्हस्के,पांडुरंग म्हस्के,शत्रूघन म्हस्के,सुनील शेळके,सुरेश म्हस्के,साहेबराव मामा शेळके,अनंथा म्हस्के,विनायक सावळे,भारत सावळे,के.टी. म्हस्के,रमेश म्हस्के,उमेश म्हस्के,ज्ञानेश्वर म्हस्के,दिनकर चौधरी,विलास म्हस्के यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Users Today : 14