निवृत्ती वेतन धारकांचे प्रश्न तातडीने सोडविण्यात येतील महाराष्ट्र राज्य लेखा व कोषागारे संचालक श्री वैभव राजे घाटगे

Khozmaster
2 Min Read

अकोला महाराष्ट्र राज्याचे लेखा व कोषागारेचे संचालक dDirector of Accounts and Treasury of Government of Maharashtra श्री वैभव राजेघाडगे हे नुकतेच अकोला येथे आले असता अकोला जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयात भेट घेतली आणि सेवानिवृत्तांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली प्रारंभी श्री वैभव राजेघाडगे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संघटनेचे अध्यक्ष सुरजमल शर्मा सचिव एकनाथराव उके सहसचिव प्राचार्य डॉ सत्यनारायण बाहेती कार्यकारिणी सदस्य श्री मोरेश्वर अंबुलकर यांनी त्यांचा सत्कार केला याप्रसंगी चर्चेमध्ये संघटनेचे अध्यक्ष सुरजमल शर्मा यांनी सेवानिवृत्तांच्या अडचणी जसे ग्रॅज्युएटी सेवानिवृत्तीनंतर पंधरा वर्षानंतर वेतन पुनर स्थापना आयकर कपाती संदर्भात तसेच त्रैमासिक आढावा बैठक आदी बाबत चर्चा केली संचालक श्री वैभव राजे घाडगे यांनी यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन आढावा बैठक तत्काळ घेण्याबाबत तसेच आय करा च्या कपाती नंतर फॉर्म नंबर 16 हे तालुका पातळीवरील कोषागार कार्यालयात उपलब्ध करून देण्याबाबत तसेच जीवित प्रमाणपत्र शक्यतो डिजिटल स्वरूपात करण्याबाबत तसेच अन्य प्रकारच्या सेवानिवृत्तांना येणाऱ्या अडचणी समस्या तत्परतेने आणि तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले व तसे निर्देश तेथेच उपस्थित असलेले जिल्हा कोषागार अधिकारी श्री मंजीत गोरेगावकर अतिरिक्त कोषागार अधिकारी निवृत्ती वेतन शाखा चे श्री संगवई यांना दिलेश्री वैभव राजघाटगे यांनी संघटनेद्वारे करण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमाबाबत गौरव उद्गार काढले व संघटनेने पुढाकार घेऊन सेवानिवृत्तांनी द्वितीय नॉमिनेशन बाबत तसेच शासनाच्या डिजिटायझेशन कार्याबाबत पेन्शनर्स ची जनजागृती करण्याचे आवाहन केले याप्रसंगी संघटनेद्वारे दरवर्षी प्रकाशित करण्यात येत असलेल्या प्रगतीपथ पुस्तिकाची प्रत संचालकांना देण्यात आलीबैठकीच्या शेवटी संघटनेचे सहसचिव प्रा डॉ सत्यनारायण बाहेती यांनी उपस्थित सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार व्यक्त केले.

 

0 9 4 7 8 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *