बुलडाणा जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने हेक्टरी 50 हजाराची मदत दया – राहुलभाऊ बोंद्रे

Khozmaster
4 Min Read

मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली मागणी, जिल्हाधिकारी व तहसिलदारांषी साधला संवाद चिखली: 21 सप्टेंबर 2022परतीच्या पावसाने उभे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले असुन शेतात उभे असलेले, सोगलेले व सुडया घातलेले सोयाबीन पिकाचे सततच्या झालेल्या पावसामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतक-यांच्या हातातोडांषी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतल्यामुळे यंदाची शेतक-यांची दिवाळी अंधारातच जाणार आहे. परिणामी शेतकरी कोलमडून पडला आहे, या नैसर्गीक संकटातुन शेतक-यांना उभारी देण्याकरीता तातडीने सरगट हेक्टरी 50 हजार रूपयाची मदत देण्यात यावी तसेच शेतक-यांच्या पिक विम्याच्या तक्रारी दुर करून विमा कंपनीला मदत देण्यास बाध्य करण्याची मागणी एका पत्राव्दारे राज्याचे मुख्यमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी केली आहे.राज्याचे मुख्यमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री नामदार एकनाथराव षिंदे यांना माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या 20 दिवसापासुन संपुर्ण जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या हातीतोंडी आलेला घास हिसकावल्या गेल्याने शेतक-यांवर संकटाचे आभाळच कोसळले आहे. सोयाबीन, कपाषी, ज्वारी सोबत इतर खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. बुलडाणा जिल्हयात सोयाबीन हेच शेतक-यांचे मुख्य व नगदी पिक असुन यावर्षी सोयाबीनचा पेराही भरपूर वाढलेला आहे. ऐन सोगणी आणी मळणीच्या काळात सुरूवातीपासूनच परतीच्या सततच्या पावसाने कहर केला, पावसाने घातलेल्या धुमाकूळामुळे शेतातील उभ्या व सोगलेल्या तसेच सुडया (गंजी) घालुन ठेवण्यात आलेल्या सोयाबीन पिकाची नासाडी झाल्याने शेतकरी प्रचंड आर्थीक अडचणीत आला आहे. पिकांची नासाडी झाल्याने हतबल झालेल्या शेतक-याचा दिवाळी सणही काळोखातच जाणार आहे. या नैसर्गीक संकटातून शेतक-यांना उभारी देण्याकरीता राज्य शासनाने तातडीने सरगट हेक्टरी 50 हजार रूपयाची मदत जाहीर करून विमा कंपन्यांना शेतक-यांना मदत देण्यास बाध्य करणे गरजेचे आहे.बुलडाणा जिल्हयासह चिखली तालुक्यात अतिषय थैयमान घातलेले असुन तालुक्यासह पंचक्रोसी मधील नदी नाल्यांना पुर आले आहे. त्यात सोयाबीनच्या सुडयाही वाहुन गेल्याचे प्रकार घडले आहे. तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मौजे अंत्रीकोळी, साकेगांव, खोर, माळषेंबा, भोगावती, वाघापुर, या गावात शेतकरी बांधवाच्या शेत बांधावर जावून नुकसानीची पाहणी करीत माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी शेतक-यांच्या व्यथा जाणुन घेतल्या. या संदर्भात राहुलभाउ बोंद्रे यांनी नुकतेच बुलडाणा जिल्हयाचा नव्याने पदभार स्विकारलेले जिल्हाधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड यांच्याषी दुरवध्वनी संपर्क साधुन त्यांना जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्हयात शेतक-यांचे झालेल्या नुकसानी बरोबरच नागरी वस्त्यांमध्ये घराच्या झालेल्या पडझडीमुळे पिडीत नागरीकांना तात्काळ मदत देण्याची मागणी केली आहे. त्याच बरेाबर आज परीसरातील नुकसान झालेल्या गावांना भेटी दिल्या त्यावेळी तहसिलदार चिखली यांच्याषी दुरध्वनी वरून संपर्क साधुन झालेल्या नुकसानीचे तात्काळ सर्र्व्हे करण्याच्या व विमा कंपण्याकडून घेण्यात येणा-या ऑनलाईन तक्रारीत अडचणी येत असल्याने त्या ऑफलाईन घेण्यात याव्यात अषा सुचनाही यावेळी दिल्या. तर या अतिवृष्टीने बाधीत गांवाना दिलेल्या भेटी दरम्यान शेतक-यांच्या प्रत्यक्ष भेटी घेवुन त्यांच्या व्यथा जाणुन घेत त्यांना धिर दिला. यावेळी माजी सभापती प्रकाष प्रकाष निकाळजे, खविसचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, प्रदिप हाके, उपसरपंच देविदास लोखंडे, आंबादा पाटील, साहेबराव पाटील, मदन षिंदे, सरपंच रामेष्वर वाघ, सतिष वाघ, विठल गिरी, बाबुराव काळे, सौदांजी वाघ, अनिल वाघ, संतोष वाघ, विजय वाघ, समाधान मोरे, कल्याण जायभाये, अमोल मोरे, जनार्दन वाघ, प्रकाष वाघ, बद्री वाघ, सोनाजी वाघ, रामगिर महाराज, सुरेष वाघ, सुनिल वाघ, लिबांजी डुकरे, तुषार तायडे, गणेष परिहार, दरबारसिंग परीहार, भारत इंगळे, नारायण इंगळे, रविंद्र परीहार, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते गावकरी, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

0 9 4 6 6 4
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *