ढगफुटी पावसामुळे शेतीचे नुकसान

Khozmaster
1 Min Read

पाऊस आला धावून शेती गेली वाहून … मुसळधार पावसाने शेतीचे पिकाचे अतोनात नुकसा नमहेंद्र हिवाळे चिखली :- अंत्री-कोळी, वाघापूर, साकेगाव, माळशेंबा, खोर, रायपुर, सावरगाव डुकरे, भोगावती, तसेच चिखली तालुक्यातील बरेचसे गाव दिनांक २० ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी २ वाजेपासून झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले. मागील काही दिवसापासून होत असलेल्या सतत पावसामुळे व ढगफुटी पावसामुळे शेतीला जोरदार फटका बसला आहे. सततच्या मुसळधार पावसाने शेतीला तलावाचे स्वरूप आले शेतकऱ्यांचे उभे असलेले सोयाबीन पिक व इतर पिके जसे की तूर, भुईमूग व कपासी पिक पावसामुळे वाहून गेले. ज्यांनी सोयाबीनची सुडी घातली त्यांची सुडी मध्ये अजूनही पाणी साचून आहे. नद्या लगतचे तसेच नाल्या लगतचे शेतामधील सोयाबीन सुडया वाहून गेल्या, दुपारी शेता मध्ये असणारे शेतकरी आपल्या उघड्या डोळ्यांनी सूडया व तसेच उभ्या पिकाचे नुकसान पाहून अस्मानी संकटाला दोष देऊन वर्षभर केलेल्या कष्टाचे हेच फळ का? तरी शासनाने त्वरित पंचनामे न करता चिखली तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकर्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई करावी अशी शेतकर्यांची मागणी शासनाने त्वरित मान्य करावी व शेतकर्यांचे अश्रू पोसावे.

0 9 4 6 6 4
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *