वडगाव तेजन येथे लंम्पी आजाराने बैलाचा मृत्यू.

Khozmaster
1 Min Read

गावात अजूनही काही जनावरांना लंम्पीची लागवन…..सतीश पाटील तेजनकर वार्ताहर वडगाव तेजन तालुका लोणार :-     लंम्पी आजाराने एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना  वडगाव तेजन तालुका लोणार येथे घडली.वडगाव तेजन येथिल रहिवासी असलेले शंकर भीमराव भागिले यांच्या बैलाचा मृत्यू झाला तर फकीरा श्रीराम तेजनकर यांच्या बैलाला लंम्पीची लागण होऊन बैलाची तब्येत खालवलेली आहे.    बिमार असलेल्या बैलाचा इलाज सुलतानपूर येथील डॉ. नेवरे पशुधन विकास अधिकारी हे स्वतः करीत आहेत.तर शंकर भागिले यांच्या बैलाच्या तब्येतीत कोणत्याही प्रकारची सुधारणा न होता बैलाचा मृत्यू झाला.यावेळी पशुवैद्यकीय दवाखाना सुलतानपूर चे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर नेवरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.तर पंचनाम्यासाठी वडगाव तेजन येथील ग्रामसेवक नंदकिशोर तेजनकर,तलाठी आर.व्ही.भाकडे,पोलीस पाटील सौ.कल्पना तेजनकर,व गावातील नागरिक शिव पाटील तेजनकर,शिवानंद शेवाळे सह अन्य गावकरी उपस्थित होते.        लंपी आजाराने अनेक जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडत असून शासन स्तरावरून लंम्पी आजारावर कायमस्वरूपी उपाय योजना करून लंम्पी आजाराने मृत पावलेल्या जनावरांच्या पशुपालकास शासन स्तरावरून आर्थिक मदत देण्यात यावी.अशी मागणी संपूर्ण गावकरी करीत आहेत.त्यानंतर उपस्थित डॉक्टरांनी व ग्रामसेवक,तलाठ्यांनी शासनातर्फे अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पत्रकार सतीश पाटील तेजनकर यांना सांगितले.

 

0 9 4 6 7 1
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *