नंदुरबार जिल्हा परीषद च्या सभापतींची निवड प्रक्रिया बिनविरोध महिला व बालकल्याण सभापतीपदी संगीता गावित , समाजकल्याण सभापती शंकर पाडवी.

Khozmaster
2 Min Read
प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -: नंदुरबार जिल्हा परिषदेच्या चार विषय समितींच्या सभापतींची निवड प्रक्रियाकाल घेण्यात आली . या सभेत नंदुरबार जि.प.महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी संगीता भरत गावित , समाज कल्याण सभापती शंकर आमशा पाडवी तर उर्वरित दोन विषय समिती सभापतीपदी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे गणेश रूपसिंग पराडके व काँग्रेसच्या हेमलता अरुण शितोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे . नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर काल गुरुवारी विषय समितींच्या सभापतींची निवडप्रक्रिया घेण्यात आली . यावेळी काँग्रेस व बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या एकाही सदस्याने नामांकन दाखल केले नाही तसेच सभेलाही त्यांची अनुपस्थिती होती .
   त्यामुळे सर्व सभापतींची निवड बिनविरोध करण्यात आली . सभापती पदासाठी शहादा येथील जयश्री दीपक दीपक पाटील व ऐश्वर्यादेवी रावल हे दोन्ही उमेदवार होते .
 इच्छुक माघारीच्या वेळे पर्यंत दोघांचीही मनधरणी नेत्यांकडून करण्यात आली होती . त्यामुळे ऐश्वर्या रावल व जयश्री पाटील यांनी माघार घेतली . परंतु नाराज झालेल्या जयश्री पाटील यांनी निवड सुरू असतानाच सभेतून काढता पाय घेतला .
   विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन्ही सदस्यांना सभापती पदाची संधी मिळाली आहे . जि.प. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी संगीता भरत गावित , समाज कल्याण सभापती शंकर आमशा पाडवी तर उर्वरित दोन विषय समिती सभापतीपदी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे गणेश रूपसिंग पराडके व काँग्रेसच्या हेमलता अरुण शितोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .
0 9 4 9 4 6
Users Today : 118
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *