प्रतिनीधी रवि मगर_बुलडाणा : देशभरात ईव्हीएमवर बंदी घालावी आणि सर्व निवडणुका बॅलेड पेपरने व्हाव्यात या प्रमुख मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चातर्फे 21 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एकदिवसीय आंदोलन करण्यात आले. भारत मुक्ती मोर्चाने जारी केलेल्या पत्रात भाजप आणि आरएसएस ईव्हीएमचा गैरवापर करून असंवैधानिक पद्धतीने निवडणूक लढवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करून अनेक राज्यांत सत्ता स्थापन केल्याचा आरोप भाजपवर होत आहे. त्यामुळे विश्वबंधुत्वासह देशाची एकता, अखंडता आणि परस्पर बंधुभाव टिकून राहण्यासाठी ईव्हीएम मशीनवर बंदी घालावी आणि देशातील प्रत्येक निवडणूक बॅलेड पेपरद्वारे पार पाडावी, यासोबतच ओबीसी समाजाची जात जनगणना आणि बिल्कीस बानो अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यात आला. प्रकरणातील सर्व दोषी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली
Users Today : 28