प्रतिनिधी विशाल गवई अकोट अकोट तालुक्यामधील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या संपूर्ण परिसरामध्ये गेल्या १० ते११ तारखेला झालेल्या सदृश्यमय ढगफुटीच्या अस्मानी संकटाने थैमान घातले होते, यावेळी परिसरातील संपूर्ण शेतकरी तसेच मजूर वर्ग हवालदील झाला होता. त्यांना झालेल्या संकटात सावरण्यासाठी सरपंच राम मंगळे यांनी खूप मदत केलीअतिवृष्टीने झालेल्या महापुराने घरामधील धान्य साहित्य वाहून गेले होते.व त्याच वेळी त्यांच गावाचे कर्तव्यदक्ष सरपंच राम मंगळे यांनी नागरिकांसाठी जेवणाची फराळाची सतत दोन दिवस व्यवस्था केली. एवढे मोठी घटना घडवून सुद्धा या गावाला कुठल्याच लोकनियुक्त आमदार. खासदार. पालकमंत्री व तसेच जिल्हाधिकारी इथल्या कुठल्याच संबंधित अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही. या झालेल्या सर्व परिसरातील शेतकऱ्यांना व मजूर वर्गांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळावा त्यासाठी आज उपोषणाला सुरुवात करण्यात आली. व जोपर्यंत शेतकऱ्यांना व गोरगरिबांना न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असे उपोषण करते बेलुरा गावचे सरपंच राम मंगळे यांनी सांगितले……
Users Today : 22