आ. सौ. श्वेता ताई महाले पाटील शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन दोन हजार रुपये जमा केले . शेतकरी सन्मान योजना असो अथवा इतर आर्थिक मदत असो बँकेमध्ये जमा झाल्यानंतर बँक व्यवस्थापनाने सदर बॅंका खात्यांना होल्ड लावल्याने शेतकऱ्यांना पैसे काढता येत नाही . याबाबत धाड , माळवंडी येथील शेतकऱ्यांनी तक्रार सुद्धा केलेली आहे..त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे असूनही त्यांची दिवाळी अंधारात जात आहे . त्यामुळे बँकांनी लावलेला होल्ड तातडीने काढून शेतकऱ्यांना तातडीने विड्रॉल देण्याची मागणी सुद्धा आमदार श्वेता ताई महाले यांनी जिल्हाधिकारी यांना केली असता त्यांनी तातडीने शिखर बँकेच्या व्यवस्थापकास बोलावून तातडीने बँकांनी खात्यांना लावलेला होल्ड काढण्याचे आदेश दिले . दिनांक 20 ऑक्टोबर 2022 रोजी आमदार शेतात महाले यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे सरसगड पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत देण्याबाबत लेखी निवेदन दिले यावेळी बँकांनी लावलेल्या मोठ्या प्रमाणात असंतोष असल्याची त्यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले असता जिल्हाधिकारी तू मोड यांनी बँकांनी लावलेले होल्ड तातडीने काढण्याच्या आदेश दिले. सप्टेंबर पासून सुरु झालेल्या पावसाने ऑक्टोंबर मध्ये सतत , संततधार , जोरदार मुसळधार पावसाने होत्याचे नव्हते केले. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला . चिखली आणि बुलडाणा तालुक्यातील प्रत्येक महसुली मंडळात 65mm पेक्षा जास्त सततचा पाऊस झालेला असल्याने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची आ सौ श्वेता ताई महाले यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा तूम्मोड यांच्याकडे लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे. सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यामध्ये मोठ्याप्रमाणावर सतत व संतत धार पाऊस पडला आहे. चिखली तालुक्यात धोडप , पेठ , एकलारा, अमडापूर , उदयनगर कोलारा, चांधई , मेरा, गोद्रि हातनी तर बुलडाणा तालुक्यांत धाड मंडळ मिलिमीटर , म्हसला ,साखळी , रायपुर, पाडळी तसेच इतर मंडळातही मोठ्या प्रमाणात सतत चा पाऊस व काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. परंतु प्रशासनाच्या निष्काळजी व हलगर्जीपणामुळे चिखली व बुलडाणा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे न केल्याने हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहत आहेत. चिखली आणि बुलडाणा तालुक्यातील महसुली मंडळांमध्ये लाखो शेतकरी खातेदार आहेत व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान अतिवृष्टीने झाले आहे. एकट्या चिखली तालुक्यात ६० हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी झालेली आहे. त्यातील जवळपास ७० ते ८० टक्के नुकसान झालेले आहे. म्हणजेच चिखली तालुक्यात ४० हजार पेक्षा जास्त हेक्टरवरील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असतांना अगदी मोजक्याच ठिकाणी नुकसान झाल्याचे दाखवून शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक मदतीपासून वंचित ठेवल्या जात आहे. ओला दुष्काळ जाहीर करा चिखली व बुलडाणा तालुक्यात झालेल्या नुकसानीची आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी महसूल व कृषी अधिकाऱ्यांच्या समवेत संपूर्ण तालुक्यात फिरून नुकसानीची पाहणी केली आहे सततच्या पावसाने भिजल्याने सोयाबीन पिकाला आलेले कोंब आलेले आहे. संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यासह चिखली व बुलडाणा तालुक्यात सप्टेंबर , ऑक्टोंबर मध्ये झालेल्या सततच्या पावसाने सगळीकडे पाणीच पाणी असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊनही काही पंचनामे झाले नाही. संपूर्ण चिखली तालुका आणि बुलढाणा तालुक्यातील महसुली मंडळातील मधील पिके अनेक दिवस पाण्यात असताना ही पंचनामे नाही. मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे सांगीतले आहे. परंतु प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी आपले स्तरावरून तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी सुद्धा मागणी आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी यावेळी केली आहे. यावेळी जिल्हा विधी सल्लागार एडवोकेट मोहन पवार , भाजपा तालुका अध्यक्ष एडवोकेट सुनील देशमुख , डॉक्टर राजेश्वर उवरंडे , प्रकाश पडोळ, गणेश राजपूत , यांची उपस्थिती होती.
Users Today : 21