चिखली तालुक्यातील सर्वात जास्त शाळा ISO झाल्याचा आनंद आ. सौ.श्वेता ताई महाले पाटील

Khozmaster
4 Min Read

चिखली : चिखली पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळेचा सर्वागीण विकास करुन शाळेमध्ये भौतिक सुविधा निर्माण करुन विदयार्थ्याना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातून सर्वात जास्त शाळांना आयएसओ मानांकन मिळाल्याचा सर्वात जास्त आनंद असुन चांगल्या यासाठी आयएसओ मानांकन प्राप्त शिक्षक आणि गट शिक्षणाधिकारी यांच्या मेहनतीचे चीज झाल्याचे प्रतिपादन आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी आयएसओ मानांकन प्राप्त शाळांच्या गौरव समारंभात बोलताना केले.          चिखली पंचायत समिती अंतर्गत आयएसओ मानांकन प्राप्त शाळा , त्या शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी वृंद यांचा गौरव सोहळा दि 20/10/2022 रोजी शिवाजी शाळेच्या सभागृहात पार पडला. आयएसओ मानांकन प्राप्त शाळांच्या प्रगती साठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न शिल       सदर गौरव सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत चालल्या असता चिखली पंचायत समिती अंतर्गत एकाच वेळी जवळ पास 28 शाळा आयएसओ मानांकन प्राप्त करता ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. या शाळांच्या भौतिक विकास , पायाभूत सुविधां आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे यासाठी जे जे करणे गरजेचे आहे ते ते केल्या जाईल. तसेच शिक्षक संघटनांचे विविध प्रलंबित प्रश्न आपण एकत्र येऊन सोडवू . तालुका , जिल्हा तसेच राज्यपातळी सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मी विधानसभेमध्ये सुद्धा आवाज आश्वासन या वेळी आमदार सौ श्वेता ताई महाले यांनी दिले चिखली पंचायत समिती मध्ये जिल्हा परिषद शाळेचा सर्वागीण विकास करुन शाळेमध्ये भौतिक सुविधा निर्माण करुन विदयार्थ्याना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने मिशन आय एस ओ शाळा व एन एम एम एस परिक्षेमध्ये 100 विदयार्थी उर्तीर्णतेचे उदीष्ट ठेवले होते.  5 सष्टेबर 2022 शिक्षक दिनी 25 शाळा आय एस ओ करण्याच्या संकल्प त्यांनी केला त्यादृष्टीने शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यांच्या सभा घेउन शाळांना भेटी देउन मागदर्शन केले आय एस ओ शाळा का करायची ? याचे महत्व पटवुन दिले या प्रेरणेतुन मुख्याध्यापक तन मन धनाने कामाला लागले व चैत्यन्याची लाट निर्माण होऊन ग्रामस्थ व पालक या मिशन मध्ये सहभागी झाले 25 शाळा रजिष्ट्रेशन करुन 22 शाळा आय एस ओ पुर्ण झाल्या यामध्ये लोकवर्गणीतुन व वस्तुरुपाने जवळपास या शाळेत 16 लाख रु प्राप्त झाले व शाळेचा कायापालट झाला . शाळा सुंदर होऊन शाळेत प्रसन्न वातावरण निर्मीतीसाठी हया शाळा पात्र झाल्या . यामुळे निश्चीतच जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढून या विदयार्थ्याना परिणामकारक व दर्जेदार शिक्षण मिळेल . एन एम एम एस परिक्षेमध्ये यश संपादन करण्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन घेण्यात आले . अतिरिक्त वेळेत वर्ग घेउन शिक्षकांनी अध्यापन कार्य केल्यामुळे तालुक्यातील 95 विदयार्थी उर्तीर्ण झाले असून 55 विदयार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहे. या सर्व गोष्टी तालुक्यातील विदयार्थ्यासाठी परिणामकारक व सकारात्मक आहे .मधुकर पाटील, भाजपा शहराध्यक्ष पंडित दादा देशमुख गटशिक्षणाधिकारी आर डी शिंदे , शिवाजी शाळेचे प्राचार्य नंदकिशोर गायकवाड , प्रवीण वायाळ विस्तार अधिकारी आर आर पाटील , देवकर सर ,प्रताप भाऊ मोरे, केंद्रप्रमुख पी एम सपकाळ , कडुबा मोरे , प्रकाश केवट , मुरलीधर मोरे , विजया कस्तुरे , भिकाजी केवट , हाडे सर , आयुब सर , थेंग सर यांच्यासह   या कार्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी, केद प्रमुख, समुह साधन व्यक्ती, फिरते विशेष शिक्षक यांची उपस्थीती होती तसेच त्यांनी यासाठी त्यांनी मेहनत घेतली .

 

0 9 4 6 7 1
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *