प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -: 39 पोलीसांना पोलीस उप निरीक्षक पदी दिवाळीची पदोन्नतीची भेट .
याबाबत अधिक माहिती अशी कि, नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अमंलदारांच्या कल्याणासाठी नंदुरबार जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी हे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात .
दिवाळी हा सर्व सणामध्ये अत्यंत महत्वाचा सण आहे .
दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात , आनंदात सर्वत्र साजरा केला जातो . प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक वेगळे क्षितीज , नवे स्वप्न घेवून दिवाळी येत असते . परंतु कोणताही सण असू द्या , पोलीस मात्र त्यांच्या कुटुंबापासून लांब राहून आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत असतात .
लोकांच्या जिविताच्या व मालमत्तेच्या संरक्षणासाठी विशेष करुन दिवाळी सणाच्या दरम्यान पोलीस हे स्वतःचा सण बाजुला ठेवून कार्यरत असतात .
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देवून त्यांची दिवाळी गोड करण्याची संकल्पना मांडली व तात्काळ मंत्रालयीन कर्मचारी यांचे कडून किती पोलीस अंमलदारांना पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती दिली जाईल ? याची माहिती घेतली . तसेच मंत्रालयीन कर्मचारी यांना तात्काळ पदोन्नती बाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले . मंत्रालयीन कर्मचारी यांचे कडून पदोन्नतीची कार्यवाही करुन पदोन्नतीस पात्र असणाऱ्या 39 अमंलदारांना आज दिनांक 22 ऑक्टोबर रोजी स्वतः पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे दालनात उपस्थित राहणे बाबत कळविले . दिवाळी बंदोबस्तामध्ये व्यस्त असलेल्या पोलीस अंमलदारांना पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे दालनात बोलविले . पोलीस अधीक्षक यांनी पोलीस दालनात का बोलाविले असेल ? असा प्रश्न त्या 39 पोलीस अंमलदारांना पडला , परंतु पोलीस अधीक्षक. पी . आर . पाटील यांनी त्या 39 पोलीस अंमलदारांना सहा . पोलीस उप निरीक्षक पदावरुन पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती झाल्याचे सांगताच त्या सर्व पोलीस अमंलदारांचा आनंद द्विगुणीत होवून त्यांचे चेहऱ्यावर हसू फुलले .
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील एकुण 39 सहा . पोलीस उपनिरीक्षक यांना सेवा जेष्ठतेनूसार पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती देऊन दीपोत्सवाची भेटच दिलेली आहे . पदोन्नती झालेल्या जिल्ह्यातील 39 पोलीस अमंलदारांना पोलीस अधीक्षक कार्यालय , नंदुरबार येथे एक छोटेखानी पण दिमाखदार कार्यक्रम आयोजित करुन.
पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी पोलीस अमंलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदाचे दोन स्टार लावून पोलीस अमंलदारांचे अभिनंदन केले व पोलीस दलातील पुढील सेवे साठी शुभेच्छा दिल्या .
या वेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे , अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत , शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर , जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव , नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर , नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार , राखीव पोलीस निरीक्षक देवनाथसिंग राजपुत इत्यादी उपस्थित होते .
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी मागील एक वर्षाच्या काळात जिल्हा घटकाच्या आस्थापनेवरील पोलीस अमंलदारांपैकी पोलीस शिपाई पदावरुन पोलीस नाईक पदावर 71 , पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर 60 तर पोलीस हवालदार पदा वरुन सहा . पोलीस उप निरीक्षक पदावर – 47,
अशा एकुण 178 पोलीस अमंलदारांना पदोन्नतीची भेट दिली असून आज दिनांक 22 ऑक्टोबर रोजी, 39 सहा . पोलीस उप निरीक्षक यांना पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली .
तसेच पदोन्नती मिळाल्यानंतर मिळणारे वेतन व भत्ते याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल ,
असे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी यावेळी सांगितले .
पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती झालेले पोलीस अमंलदार…
असई. अंकुश बाबुलाल खेडवन, असई.राजु काशिनाथ मोरे, असई. सुरेश लाला चव्हाण, असई.विजय जगन्नाथ पाटील, असई. दिलीप मौल्या गावीत, असई. युवराज राजाराम वाणी, असई. विष्णू बाबुराव गायकवाड, असई. राजेंद्र राजाराम सोनवणे, असई. अविनाश यशवंत पंडित,
असई. रविंद्र भिमराव लोंढे.
असई. योगेश जयराम गांगुर्डे, असई.शिवाजी सुरेश काटकर असई. संजय रामदास जाणे, असई.राजेंद्र पंडित साळुंके, असई. वेडू गबाजी जाधव,
असई. अनिल वसंतपुरी गोसावी,
असई. मगन रामसिंग गावीत, असई. किशोर नारायण बडगुजर, असई. शिवदास रुपचंद देवरे,
असई.गणपत सुक्राम भिल,
असई. जगन रेशमा वळवी, असई. सुशिल बाबुराव सोमवंशी, असई. कमलसिंग मुरलीधर पवार,
असई स्वरुपसिंग शिड्या गावीत,
असई.जगदिश बाबुलाल सोनवणे,
असई. सखाराम नादया वळवी, असई.कांतीलाल मांगड्या कोकणी,
असई. रमेश फाड्या पावरा, असई. बळवंत दिवाण वळवी, असई.रविंद्र शांताराम पाटील, असई.राजेश शंकर पाटील, असई. रुदाम ओंकार न्हावडे, असई. दयाराम सित्या वळवी, असई. उत्तम दामु वळवी,
असई. भिकाजी खाल्या वळवी, असई.श्रावण पिरन बिरारी, असई.प्रकाश नथ्थु भाबड, असई.अंबालाल बंडु मोरे,
असई. रमेश वादु गायकवाड,
Users Today : 118