प्रतिनिधी रामेश्वर वाढी
पातूर :- शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या प्रांगणात अकोला पूर्व मतदार संघाचे आमदार व महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस रणधीर भाऊ सावरकर, माजी आमदार बळीराम भाऊ सिरस्कार, जयंतराव मसने माजी सभापती महानगरपालिका, अकोला,जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव वाकोडे,महादेवराव मानकर,तालुका अध्यक्ष रमण सेठ जैन, जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह गहिलोत, तालुका सरचिटणीस राजूभाऊ उगले,कपिल खरप,जिल्हा सचिव प्रेमानंद श्रीरामे,जिल्हा सचिव चंद्रकांत अंधारे, भिकाजी धोत्रे,शहराध्यक्ष अभिजीत गहिलोत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

आमदार रणधीर भाऊ सावरकर, माजी आमदार बळीराम भाऊ सिरस्कार व उपस्थित सर्व मान्यवरांनी वसुबारस च्या निमित्ताने सकाळ मीडिया ग्रुपच्या वतीने आयोजित गाय म्हणजे माय या अभियानाला प्रतिसाद देत गाय व वासराची पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ पातुर चे अध्यक्ष तसेच जैविक महासंघ अकोलाचे जिल्हा सचिव व माजी नगर सेवक सचिन भाऊ ढोणे यांनी आमदार रणधीर भाऊ सावरकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांची बुके देऊन स्वागत केले.
भाजपा पक्षप्रवेश कार्यक्रमाप्रसंगी सर्वप्रथम सचिन भाऊ ढोणे यांनी पक्षप्रवेश केला त्यांचे सहकारी प्रशांत म्हैसणे, निखिल नीलखण,सुनील पाटील,विशाल कुटे, प्रभुदास बोंबटकर, नवीन करंगळे,पुरुषोत्तम भगत, संजय आवटे,महिंद्र ढोणे, दादाराव ढोणे,नवीन पेंढारकर,अक्षय बगळेकर, धीरज बोळे, प्रियाताई कोथळकर, कल्पनाताई म्हैसणे, संतोष बगळेकर, सचिन तायडे,सह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची आमदार रणधीर भाऊ सावरकर माजी आमदार बळीराम भाऊ सिरस्कार व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते बुके व पक्षाचे निशान गळ्यात घालून फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केले.
यावेळी समाजसेवक विजय काळपांडे,गुलाबराव गाडगे,राजाराम देवकर, डॉक्टर सुनील आवटे, विनेश चव्हाण,मंगेश केकान,ज्ञानेश्वर जाधव,संजय उजाळे, रणजीत देशमुख,विठ्ठल लोथे,गोपाल गालट,अंकुश राठोड, गोपाल चतरकर,श्रीकांत बराटे, गजानन गुजर,बाळू गोतरकार, विष्णू शेलारकर,दिलीप बगाडे, गिरी गुरुजी सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते..
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी आपल्या भाषणातून भाजपा हा एकमेव पक्ष देशाला तारणारा असून देश व देशाचा कारभार पाहण्यासाठी सक्षम आहे याशिवाय कोणताही पक्ष देशाचे नेतृत्व करण्यास सक्षम नाही त्यामुळे भाजपा हा एकमेव पर्याय समजावा असे प्रतिपादन केले तर पातूर येथील खडकेश्वर गणेश उत्सव मंडळाने महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेश उत्सव पुरस्कारात महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल अभिनंदन करून सर्व गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या वरिष्ठ मंडळींचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हादराव निळकंठ यांनी केले तर आभार सुनील राखोंडे यांनी मानले.
Users Today : 22