पातूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात तहसीलदाराच्या माध्यमातून शासन दरबारी शेतकऱ्यांचा ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निवेदनाद्वारे मागणी अटी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी

पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन, तूर, ज्वारी, कपास, उडीद ,मूंग यासारखे पीकाचे ऐन दिवाळीच्या तोंडावर सततच्या पावसामुळे नुकसान झाले असून पातुर तहसीलवर शेतकऱ्यांचा मोठ्या संख्येत शेतकऱ्यांनी हजेरी लावली तर शेतकऱ्यांनी तहसीलदार दीपक बाजाड यांच्या माध्यमातून शासनाच्या पटलावर शेतकऱ्यांनी ओला दुष्काळाची मागणी केली आहे

अन्यथा आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला आहे शेतकरी नेते कृष्णराव अंधारे यांनी स्वतः तहसीलदार दीपक बाजड यांच्याशी चर्चा करून झालेल्या नुकसानीचे सर्वे करण्यात यावे अशी मागणी केली आहे,

तर यावेळी शेतकरी जागर मंच व सर्वपक्षीय नेते शेतकरी नेते कृष्णराव अंधारे , निलेश कापकर , रक्षण देशमुख, निशांत ताले देशमुख, श्रीधर लाड, मोहिनुद्दीन, मो साजीद, गोपाल महाले, दिगंबर महाले ,मंगल तेलगोटे वसंत तेलगोटे, माणिक देठे, वसंतराव लखाडे, तुळशीराम कीर्तने, भारत उकर्डा यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शविली

0 9 4 7 8 2
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *