आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आ. सौ. श्वेताताई महाले यांच्या वतीने दिवाळी फराळ व साडी चोळी

Khozmaster
3 Min Read

चिखली: सततची नापिकी , तसेच गत दोन तीन वर्षांपासून परतीच्या पावसाच्या होत्याचे नव्हते झाले, सोबतच डोक्यावरील कर्जाचा डोंगर उतरवता न आल्याने कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी गोड व्हावी यासाठी आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिवाळीचे फराळ आणि आत्महत्या केलेली शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीस साडी चोळीचे वाटप करण्यात आले आहे.

मागील वर्षीच्या दिवाळी पासून ते आता पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या एकूण 49 कुटुंबीयांना फराळ व साडी चोळीचे वाटप करण्यात आले.       सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याने कुणीही आत्महत्या करू नयेआ. सौ.श्वेता ताई महाले पाटील राज्यामध्ये निष्क्रिय सरकार जाऊन सक्रिय सरकारची स्थापना जनतेच्या आशीर्वादाने झालेली आहे सरकार हे घरात बसणारे नसून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची सुखदुःख समजून घेणारे हे सरकार आहे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासारखे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभलेले आहे ते सप्टेंबर येताक्षणीस त्यांनी शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांची घोषणा केलेली आहे यामध्ये युती सरकारने शेती पिकांच्या देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईच्या निकषात भरघोस वाढ केली. सदर वाढ दोन हेक्टर वरून तीन हेक्टर पर्यंत मदत जाहीर केली. यामध्ये जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी 6800 वरून 13600 रू केली . बागायत पिकांसाठी रू.27000/- प्रति हेक्टर,3 हेक्टरच्या मर्यादा केली .बहु वार्षिक पिकांसाठी18000 रुपयांवरुन 36000/- प्रति हेक्टर,3 हेक्टरच्या मर्यादेत मदत जाहीर करून मोठा दिलासा दिला आहे. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान 50 हजाराचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा केले. भूविकास बँकेचे असणारे कर्ज माफी देण्यात आली. ज्या ज्या वेळी शेतकरी संकटात सापडला त्या त्या वेळी केंद्रातील नरेन्द्र मोदी सरकार आणि राज्यातील युती सरकारने शेतकऱ्यांना आधार दिला. संकटे ही येतच असतात . पण त्याने डगमगून जाऊन आत्महत्या करणे हा त्यावरील मार्ग नसल्याने सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याने कुणीही आत्महत्या करू नये असे आवाहन यावेळी आ सौ श्वेता ताई महाले यांनी यावेळी करून सर्वांना दिवाळी सुख समृध्दी ची जावो अशा शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या.यावेळी पंडीतदादा देशमुख शहराध्यक्ष भाजप, अंकुशराव पाटील, प्रा वीरेंद्र वानखेडे जिल्हा कार्यकारणी सदस्य भाजप,शिवराज पाटील, विजय नकवाल , सूनील पोफळे, गजानन इंगळे,शाम वाकद कर, अनमोल ढोरे पाटील तालुका उपाध्यक्ष भाजपा, सुरेश इंगळे , नीरज गायकवाड सरपंच,अक्षय आदमाने, प्रवीण खंडेलवाल, मुकेश पडघान,गणेश वाघमारे, संदीप म्हस्के, पवन चोपडा, समाधान वाघमारे, व इतर उपस्थित होते.

 

0 9 4 6 7 1
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *