षिंदे,फडणवीस सरकारची 100 रू.ची किट अनं कोटयावधींचा गाजावाजा

Khozmaster
3 Min Read

चिखली दिवाळीच्या ‘आनंदाच्या षिधेचा’ फटाका ठरला नागरीकांसाठी फुसका बार जिल्हयात 13 पैकी 7 तालुक्यात ‘आनंदाची षिधा’ पोहचलीच नाही  चिखली: 21 सप्टेंबर 2022 राज्यातील नागरीकांची दिवाळी गोड व्हावी म्हणुन राज्यातील षिंदे, फडणवीस सरकारने 100 रूपयात साखर, रवा, चनादाळ, पामतेल अषा चार वस्तु आनंदाची षिधा या नावाने देण्याचा राज्यभर गाजावाजा केला. मात्र ऐन दिवाळीत बुलडाणा जिल्हयात एकुण 4 लाख 88 लक्ष षिधा किटची आवषकता असतांना केवळ 1 लाख 50 हजार किट स्वस्तधान्य दुकानदारांना प्राप्त झाल्याची माहिती आहे. जिल्हयातील 13 तालुक्यांपैकी 6 तालुक्यांना ही आनंदाची षिधा पोहचली खरी मात्र ती सुध्दा अर्धवटच आहे. राज्यातील शेतकरी व नागरीक अतिवृष्टीमुळे हवालदिल असतांना ऐन दिवाळीतही जिल्हयातील 7 तालुके या योजनेपासुन वंचितच ठरत आहे. वाटप करण्यात येणा-या थैल्यांवर षिंदे, फडणवीसांचे फोटो नसल्या कारणांने अनेक ठिकाणी या योजनेचे वाटप रखडले आहे. परिणामी षिंदे, फडणवीस सरकारने सर्वसामान्य नागरीकांसाठी 100 रूपयात दिवाळी गोड करणा-या योजनेचा फटाका फुसका बारच ठरला असल्याची प्रतिक्रीया व्यक्त करीत ही योजना नागरीकांच्या हातावर तुरी देणारी ठरली असल्याचा घणघणाती आरोप बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केला आहे.नागरीकांना दिवाळीची भेट म्हणुन षिंदे,फडणवीस सरकारने 100 रूपयात साखर, रवा, चनादाळ आणी पामतेल देण्याचा मोठा निर्णय उदार अंतकरणाने घेत कोटयांवधीच्या योजनेचा मोठा गाजावाजा केला. मात्र दिवाळी पूर्वी या योजनेची अमलबजावनी होणे गरजेचे असतांना ऐन दिवाळी सणाच्या काळातही जिल्हयातील नागरीकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहचला नसल्याने षिंदे, फडणवीस सरकारच्या विरोधान संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे. चिखली, बुलडाणा, मलकापुर, मोताळा, खामगांव, शेगांव या तालुक्यात वाटप सुरू करण्यात आला आहे मात्र यातही ब-याच ठिकाणी किट मधील काही वस्तु नदारद असुन षिंदे,फडणवीसांचे फोटो असलेल्या थैल्या स्वस्तधान्य दुकानात पोहचल्या नाही. म्हणुन किटचे वाटप रखडले आहे. तर जळगांव जामोद, नांदुरा, संग्रामपुर, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा व देउळगांव राजा या सात तालुक्यात षिंदे,फडणवीस सरकारची ‘आनंदाची षिंधा’ पोहचलीच नसल्याने लाभार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे स्वस्त धान्य दुकानदारांची डोकेदुखी मात्र वाढली आहे.षिंदे, फडणवीस सरकारची कोटयावधी रूपयाची ही योजना ऐन दिवाळीत कषी फुसका बार ठरली याचे उदाहरण दयावयाचे झाल्यास एकटया चिखली तालुक्याची आकडेवारी पाहता तालुक्यात 53 हजार किटची आवष्यकता असतांना, केवळ 8 हजार किट चिखली गोडावूनला प्राप्त होवुन वाटप होत आहे, त्यापैकी अमडापुर गोडावूनला वाटकरीता आलेल्या किटमध्ये चनादाळ नसल्यामुळे वाटप रखडल्याची माहिती आहे. एकंदरीत राज्य शासनाने केलेली योजना सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याऐवजी तोंडाला पाने पुसून गेली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे दिवाळी सणात षिधा धारकांच्या आनंदावर विर्जन पडल्याचे चित्र पाहावयास मिळत असल्याचे बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे म्हटले आहे.

0 9 4 6 7 1
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *