अतिवृष्टी मुळे शेतांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी: राजेंद्र लहाने

Khozmaster
1 Min Read

चिखली | मेघा जाधव अतिवृष्टी मुळे शेताच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त बळीराजाला तात्काळ मदत मिळावी या मागण्या करिता ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे अध्यक्ष राजेंद्र लहाने हे सरकारकडे शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी करत आहे.यावर्षी संपूर्ण खरीप हंगामातील पिकांचे त्यामध्ये कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद, मूग त्याचप्रमाणे फळबागा व बियाणे उत्पादक शेतकऱ्यांचे शेडनेटमधील सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. बळीराजा हा पूर्णतः खचून गेला आहे.आसमानी संकटामुळे व बियाणे उत्पादक शेतकऱ्यांचे शेडनेटमधील सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. एन दिवाळीच्या मुहूर्तावर घासतोंडी येता येता राहून गेला. शेतकऱ्यांना आता त्यांची दिवाळी अंधारातच करावी लागणार या प्रश्नाने शेतकरी पूर्णतः खचून गेला आहे आपल्या कुटुंबीयांचा कोणत्या साधनावर उदरनिर्वाह करावा हा विचार करून शेतकरी हवालदिल होत आहे. या परिस्थितीचे गांभीर्याने तात्काळ सर्वेक्षण करून सरसकट मदतीच्या दृष्टीने आपल्या स्तरावरुन विचार करावा जेणेकरून या मदतीच्या आशेने मेटाकुटीस आलेला शेतकरी आत्महत्येचा विचार करणार नाही असे असे मत ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे अध्यक्ष राजेंद्र लहाने यांचे आहे. तसेच सर्व शेतकरी बांधवातून ही मागणी होत आहे की सरकारने आर्थिक मदत जाहीर करावी ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्यावी

0 9 4 6 7 1
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *