खामगाव सद्यास्थितीत खामगाव तालुक्यामध्ये जनावरात लम्पी या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास येत आहे. हा रोग संसर्गजन्य असल्याने संसर्गातून इतर निरोगी जनावरांना लागण होऊ नये म्हणून शेतकरी बांधवांनी काळजी घेणे आवश्यक आहे. लम्पी या चर्मरोगाची लक्षणे आपल्या जनावरामध्ये दिसू लागल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळवावे, किंवा टोल फ्री क्रमांक १८००२३२२०४१८. अथवा राज्यस्थरीय कॉल सेंटर क्रमांक १९६२ या नंबर वर संपर्क साधावा आपल्या बाधित जनावरांबाबत न. कळविल्यास प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ मधील कलम ३२ नुसार संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद केला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.निरोगी जनावरांना लागण होऊ नये करीता त्यांचे पशुवैद्यकीयांच्या सहाय्याने लसीकरण करुन घ्यावे. लम्पी चर्मरोगाने ग्रस्त जनावरास इतर निरोगी जनावरांमध्ये मिसळू देऊ नये त्यांचे काटेकोरपणे विलगीकरण करणे बंधनकारक आहे. बाधीत जनावरांचा पशुवैद्यकीय दवाखान्याच्या डॉक्टर्स मार्फत उपचार करून घ्यावा. उपचारानंतर लम्पी बरा होऊ शकतो संसर्ग झालेल्या भागातील जनावरांचे बाजार बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोणत्याही भागात अनधिकृत बाजार भरल्यास तात्काळ पोलीस विभागाशी किंवा तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा. रोगग्रस्त जनावराचा मृत्यू झाल्यास त्याला किमान ८ फुट खोल खड्डयात गाडून त्याची विल्हेवाट लावावी. मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकाची जनावरांचा गोठा व आजुबाजूचा परीसर फवारणी करावी जेने करून डास, माशा, गोचिड आदी बाह्य किटकाव्दारे होणारा प्रसार रोखता येईल. अशी फवारणी पुन्हा २१ दिवसानंतर करावी.जनावरांना लागण झाल्याचे निदर्शनास आल्यास / लक्षणे दिसू लागताच उपचारासाठी तातडीने संपर्क साधावा जनावर मृत झाल्यास त्यांच्यावर उपचार करुन घेतले होते का ? किती दिवस उपचार केले इत्यादी बाबत माहिती मदत देताना घेतली जाणार आहे. सर्व नागरीकांनी आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. निरोगी जनावरांचे लसीकरण, बाधीत जनावराचे विलगीकरण व औषधोपचार करुन घ्यावेत असे आव्हान करण्यात येत आहे.सर्व नागरीकांनी आपल्या जनावरांबाबत काळजी घ्यावी.लसीकरण, विलगीकरण, औषधोपचार डॉक्टराच्या सल्याने करून घ्यावे असे आव्हान खामगाव तहसीलदार अतुल पाटोळे यांनी केले.
Users Today : 21