खाजगी प्रवासी बसेस यांनी शासनाच्या दराप्रमाणे भाडे आकारावे

Khozmaster
1 Min Read

अकोला –  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे  भाडेदर विचारात घेऊन खाजगी बससाठी येणाऱ्या प्रति कि. मी. भाडेदराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर शासनाने शासन निर्णय दि. 27 एप्रिल 2019 नुसार निश्चित केले आहेत. त्याअनुषंगाने आगामी सण उत्सव कालावधीत खाजगी बस मालकांकडून शासनाने निश्चित केलेल्या प्रति कि. मी. भाडे आकारण्यात येऊ नये असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अकोला यांनी केले आहे. तसेच बस संचालकांनी आकारावयाचे महत्तम भाडे विहीत नमुन्यात तक्ता करुन दर्शनी भागास लावण्यात यावा. खाजगी वाहतुकदारांनी निर्धारित करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास वाहतुकदारांवर कारवाई करण्यात येईल. जास्तीचे भाडे घेतल्यास प्रवाश्यांनी योग्य पुराव्यासह dyrto.30-mh@gov.in  येथे रितसर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

0 9 3 7 4 1
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *