आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजना; भुमिहीन आदिवासी लाभार्थांना मिळणार जमीन

Khozmaster
1 Min Read

अकोला –  एकात्मिक  आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा  वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील भुमिहीन दारीद्रय रेषेखालील आदिवासी लाभार्थांना आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत चार एकर जिरायती किंवा दोन एकर बागायती जमीन  मिळणार आहे. जमीन खरेदीसाठी शेत जमीन मालकांकडुन शेत जमीन विक्रीचा प्रस्ताव दि. 18 नोव्हेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा. छापील योजनेचा अर्ज आदिवासी विकास प्रकल्प येथे विनामुल्य शेतजमीन मालकांना देण्यात येईल. पात्र व इच्छुक शेतकरी मालकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक  आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांनी केले.

0 9 4 7 8 2
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *