अंगणवाडी व आशा सेविका यांचे कोरोणा काळातील काम न विसरता येणारे

Khozmaster
3 Min Read

आ. सौ. श्वेता ताई महाले पाटील चांडोळ: कोरोना या आजाराने साऱ्या जगात हाहाकार माजवला होता. कोरोना आजाराने जेव्हढे बळी घेतले त्याच्या पेक्षा जास्त मृत्यू कोरोणाच्या दहशतीने गेले असल्याचे आता बोलल्या जात आहे. कोरोना हा आजार नवाच असल्याने वैद्यकिय मोठमोठ्या पदव्या घेतलेले आणि ज्यांचे आयुष्य वैद्यकिय सेवेत गेले त्या तज्ञ डॉक्टरांना सुद्धा कोरोनची मोठ्या प्रमाणावर भीती निर्माण झालेली होती . अशा दहशतीच्या छायेखाली अंगणवाडी व आशा सेविका यांनी स्वतः च्या जीवाची पर्वा न करता त्यांनी कोरोना प्रतिबंधासाठी स्वतःला झोकून दिले. प्रत्येक घरी जाऊन त्यांनी कोरोना प्रतीबंधक उपाययोजना केल्या . हे कार्य करतांना त्यांच्यावर काही समाज कंटकानी हल्ले सुद्धा केले . पण अंगणवाडी व आशा सेविका यांनी त्यांचे काम बंद पडू दिले नाही. या मोबदल्यात त्यांना शासनाने जाहिर केलेले मानधन सुद्धा बरेच दिवस भेटले नव्हते. त्यामुळे अंगणवाडी व आशा सेविका यांचे कोरोना काळातील कार्य न विसरता येणारे असल्याचे गौरवोद्गार आ. सौ. श्वेता ताई महाले पाटील यांनी चांडोळ येथे झालेल्या अंगणवाडी व आशा सेविका सत्कार सोहळ्यात केलें       चांडोळ येथे अंगणवाडी व आशा सेविका यांचा सत्कार सोहळ्यात आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या.          कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देणाऱ्या अंगण वाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस यांचा धाड जिल्हा परीषद च्या वतीने विष्णु वाघ तालुका उपाध्यक्ष भाजपा यांनी आयोजीत केलेल्या सेवा कार्य कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहून त्यांना साडी,चोळी, फराळ वाटप केले.           यावेळी ॲड सुनील देशमुख तालुका अध्यक्ष भाजप, श्रीरंग अण्णा वेंन्डोले जिल्हा कार्यकारणी सदस्य भाजप, योगेश राजपूत तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, डॉ राजेश्वर उबरहंडे, डॉ तेजराव नरवाडे सरपंच , गजानन देशमुख तालुका उपाध्यक्ष भाजपा, राजू चादा तालुका उपाध्यक्ष भाजपा, विठोबा पाटील तायडे जेष्ठ नेते , विष्णु उगले पाटील सरपंच , विशाल विसपुते शहराध्यक्ष भाजपा, सिध्देश्वर लडके , अरुण पाटील , भास्कर पडोळ, प्रकाश सूसर, पुरूषोत्तम भोंडे, बाबुराव ताठे, अनिल जाधव तालुका अध्यक्ष ओबीसी सेल, गजानन सपकाळ, खांडवे सर, अनिल अपार, सोनु तायडे , प्रकाश राउत , विनोद जाधव , सखाराम नेमाडे, प्रकाश देशमुख, अशोक कणसे, गजानन शिंदे , सचिन वाडू, प्रताप मेहर, सुखदेव सोनूने, भारत पाकळ, सुभाष धनावत, रामदास नेमा डे, डॉ सुयोग राजपूत, डॉ क्षिरसागर मॅडम यांच्यासह अंगणवाडी सेविका, आशा सेविका व मदतनीस तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

0 9 4 6 7 4
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *