मौजे माळवंडी व मौजे अन्त्रीतेली येथिल पुरात वाहून गेलेल्यांच्या कुटुंबियांला प्रत्येकी चार लाखाचा आ. सौ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते धनादेश प्रदान

Khozmaster
1 Min Read

बुलडाणा : माळवंडी येथील स्व गजानन प्रकाश काळे हे गत दोन महिन्यापूर्वी आलेल्या पुरात वाहुन गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला होता .तसेच अन्त्री तेली येथील स्व साहेबराव म्हस्के ये गत दोन महिन्यापूर्वी आलेल्या पुरात वाहुन गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला होता .कोणत्याही मदतीने म्हस्के व काळे कुटुंबीयांचे दुखः हलके होणार नाही. परंतू त्यांच्या पश्चात निराधार झालेल्या कुटुंबाला फुल ना फुलाची पाकळी म्हणून शासनाकडुन देय असलेला दि 24/10/2022 रोजी दिवाळीच्या दिवशी चार लक्ष रुपयांचा धनादेश त्यांच्या पत्नी श्रीमती मंगला बाई साहेबराव म्हस्के यांना प्रदान करण्यात आला. स्व साहेबराव म्हस्के यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आई व वडील असा आप्त परिवार आहे .माळवंडी ता. बुलडाणा येथील शेतकरी स्व स्व गजानन प्रकाश काळे यांचा दोन महिन्यापूर्वी तेथीलच नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेले होते . त्यात त्यांचे दुःखद निधन झाले होते. कोणत्याही मदतीने काळे कुटुंबीयांचे दुखः हलके होणार नाही. परंतू त्यांच्या पश्चात निराधार झालेल्या कुटुंबाला फुल ना फुलाची पाकळी म्हणून शासनाकडुन देय असलेला दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी चार लक्ष रुपयांचा धनादेश त्यांच्या पत्नी श्रीमती चंद्रभागाबाई गजानन काळे यांना प्रदान करण्यात आला.यावेळीॲड सुनील देशमुख, तहसिलदार खंदारे साहेब, डॉ राजेश्वर उबरहडे, सौ लक्ष्मी ताई शेळके माजी सभापती जिल्हा परीषद, अमोल उबरहंडे, राजु नाटेकर व इतर उपस्थित होते..

 

 

0 9 4 6 7 1
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *