कारचा भीषण अपघात ; पाच जण जखमी

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -:नवापूर तालुक्यातील निंबोणी गावाजवळ आज दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास कारचे टायर निघाल्याने कारचा अपघात झाला आहे . कार नदीत कोसळली असती तर मोठी दुर्घटना झाली असती सुदैवाने कार कठड्यामुळे वाचली . या अपघातात पाच जण जखमी झाल्याची घटना घडली आहे .   प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार , महाराष्ट्रातील अकोलाहून गुजरात राज्यातील भरूच येथे पागृथ परिवार दिवाळी सणाच्या भाऊबीज सण साजरा करण्यासाठी जात असताना नवापूर तालुक्यातील निंबोणी गावाजवळील पुलाजवळ ( क्र . एम . एच .३० , ए . झेड . १६३१ ) कारचा पुढच्या टायर निघाल्याने कार अनियंत्रित होऊन पुलाच्या कठड्याला जाऊन आदळल्याने अपघात झाला .     या अपघातात आरव अनुराग पागृथ ( वय ११ ) हा मुलगा गंभीर जखमी झाला . त्याचसोबत आई- ज्योती अनुराग पागृथ ( वय ३० वडील ) अनुराग पुरुषोत्तम पागृथ ( वय ३२ ) आजोबा पुरुषोत्तम विठ्ठलराव पागृथ ( वय ६६ ) आजी दीपा पुरुषोत्तम पागृथ ( ६२ ) हे पाच जण जखमी झाले आहेत . अपघातात कार मधील एअर बॅग वेळेवर निघाल्याने सर्वांचे प्राण वाचले आहे .     अपघात होताच स्थानिक नागरिकांनी मदत कार्य करत 108 रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना खांडबारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले . या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे .       खांडबारा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे पाठवण्यात आला आहे . घटनास्थळी बघणाऱ्यांनी एकच मोठी गर्दी केली होती .     या घटनेबद्दल पोलिसांना कुठलाही थांगपत्ता नव्हता अपघातांच्या बाबतीत पोलीसांनी सतर्क राहणे गरजेचे आहे . अपघात स्थळी संपूर्ण गाव गोळा होऊन जाते परंतु पोलिसांना त्याचा थांगपत्ता लागत नाही . याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे . स्थानिकांनी कुठलाही विलंब न करता अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचवल्याने त्यांचे प्राण वाचले .

 

0 9 4 9 2 8
Users Today : 100
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *