प्रतिनीधी रवि मगर सर्वश्रुत बहुजन साहित्य संघ, चिखली, जि. बुलढाणा च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व दि. २०-११-२०२२ रोजी चिखली येथील सुप्रसिद्ध महाराजा अग्रसेन रिसॉर्टच्या जनआकर्षणाचे केंद्र असलेल्या भव्य सभागृहात संपन्न होत असलेल्या बहुजन साहित्य संमेलन – २०२२ साठी अध्यक्ष म्हणून, ज्येष्ठ समीक्षक विचारवंत तथा ज्यांच्या लिखाणाची अंतर्राष्ट्रीय स्तरावर पुरस्कारासाठी नुकतीच निवड करण्यात आली असे, साहित्य क्षेत्रातील समर्थ व्यक्तिमत्त्व असलेले मेहकर निवासी आयुष्मान किरण शिवहर डोंगरदिवे सरांच्या नांवाची घोषणा सर्वानुमते करण्यात येऊन, त्या निमंत्रण पत्रासह, साहित्य विश्वातील अत्यंत परिक्षणीय अध्ययनशील प्रांत म्हणून ज्याकडे पाहिले जाते अशा समिक्षा क्षेत्रातील त्यांच्या नुकत्याच जवळजवळ ऐंशी पानी ” काव्य प्रांतातील स्त्री ” नामक प्रकाशनाच्या वाटेवर असलेल्या ग्रंथरूपी साहित्य कृतीचा विचार होऊन, बहुजन साहित्य संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ” फुले-शाहू-आंबेडकर ” या बहुमानाच्या पुरस्काराच्या या अगोदरंच झालेल्या घोषणेच्या अनुषंगाने सदर पुरस्काराचे निवड पत्र सुध्दा मेहकर येथे मान्यवर साहित्यिक मंडळींच्या उपस्थितीत संघाचे निमंत्रक/संघटक ज्येष्ठ कवि कथाकार बबन महामुने, सचिव शाहीर मनोहर पवार तथा अध्यक्ष अॅ ड विजयकुमार कस्तुर, चिखली यांच्या हस्ते त्यांना सन्मानाने प्रदान करण्यात आले
Users Today : 16