ऐन दिवाळीत नेट, सेट, पीएचडी धारक संघर्ष समिती रस्त्यावर!

Khozmaster
3 Min Read

प्रतिनीधी रवि मगर-वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीची मागणी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पदस्पर्शाने क्रांतिकारी पुनीत महाराष्ट्रात पोटाला चिमटा घेऊन शेतकरी शेतमजूर वंचित सर्वसामान्य बहुजन समाजातील पालक वर्गाने आपल्या मुलाने उच्च शिक्षण घेऊन मोठे व्हावे, हे स्वप्न पाहिले!; परंतु गेल्या अनेक वर्षापासून प्राध्यापक भरती बंद करून निर्ढावलेल्या मायबाप सरकारने या उच्चशिक्षित तरुणांची चेष्टाच केली; वय संपून गेल्याने विवाहासह पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. या अत्यंत विदारक स्थितीमुळे उच्चशिक्षित बेरोजगारांची सहनशीलता संपली असून यंदाच्या ऐन दिवाळीत गोडधोड पदार्थासह आनंद घेण्याच्या दिवसात विद्यापीठ आणि उच्चशिक्षण कार्यालयासमोर प्राध्यापक भरतीसाठी आंदोलन करण्याची दुर्दैवी वेळ आली. दरम्यान, नेट सेट एचडी धारक संघर्ष समितीच्या वतीने आरपारची लढाई लढण्यासाठी आंदोलन पुकारले आहे.आज नेट सेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या वतीने समन्वय समितीचे डॉ. परमेश्वर पौळ यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा समोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी कुलगुरू व प्रकुलगुरू, उच्च व तंत्र विभागाचे विभागीय सहसंचालक यांच्यासह नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रशासनाला मागण्या व आंदोलनाचे स्वरुप कळवले आहे. निवेदन देताना समितीचे राज्य समन्वयक डॉ.परमेश्वर पौळ, डॉ. जीवन चव्हाण, डॉ. के.के. कदम, डॉ.बाबू गिरी, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. अटकोरे एम.टी.डॉ.वर्षा मोरे,प्रा.पांदेवाड अनुसया, प्रा.माधव पुयड, प्रा. देबडवार राजेश, डॉ.घोडगे बी.आर., प्रा.जी.जी.शिंदे, प्रा. बी.आर. नरवाडे, प्रा.एम.बी.इबीतवार, प्रा. निरंजन गिरी आधी प्राध्यापका सह मोठ्या प्रमाणावर नेट सेट,पीएचडी धारक तरुण उपस्थित होते.औरंगाबाद या ठिकाणी शिक्षण उपसंचालक यांना ही निवेदन देण्यात आले यावेळी प्रा.डॉ. अमोल मस्के डॉ. संतोष जाधव प्रा.विकास गवई उपस्थित होते  वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक भरती करावी, तासिका तत्वावरील धोरण बंद करावे, या प्रमुख मागण्यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. या राज्यव्यापी आंदोलनात प्राध्यापक भरतीसाठीच्या आंदोलनाचे लोन राज्यात पसरले असून, येत्या काळात कायमस्वरूपी प्राध्यापक भरती न झाल्यास पेपर तपासणीवर बहिष्कार आणि काम बंद आंदोलननाचे हत्यार उपसण्यात येणार असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने डॉ. परमेश्वर पौळ यांनी जाहीर केले आहे.दरम्यान, राज्यभरातील विविध महाविद्यालात सीएचबी तत्त्वावर काम करीत असलेले प्राध्यापक आणि नेट सेट पीएचडी धारक बेरोजगार उमेदवारांमध्ये संतप्त भावना व्यक्त करण्यात येत असून त्याचे परिणाम भविष्यात होतील, असा इशारा देण्यात आला आहे.

0 9 4 6 6 6
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *