पंजाब सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा पातूर:-देशातील बहुतांश राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी केंद्र सरकार पुरस्कृत्त राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात आलेली होती . परंतु या पेन्शन योजनेमध्ये जुन्या पेन्शनप्रमाणे लाभ मिळत नसल्याने देशातील सर्वच राज्यातील कर्मचारी जुनी पेन्शन योजनेची मागणी करु लागले आहेत .यातच पंजाबचे मुख्यमंत्री भागवंत मान यांनी आपल्या राज्य कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सणानिमित्त जुनी पेन्शन लागु करुन भेट जाहीर केली पंजाब राज्य सरकारच्या सन 2004 नंतर राज्य शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात आलेली होती . सदर योजनेला पंजाब सरकारी कर्मचाऱ्यांकडुन मोठा विरोध होत होता . पंजाब राज्याची विधानसभेची सार्वत्रिक निवडणुकीवेळी आप पक्षाने कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले होते कि , आम आदमी पार्टीची सत्ता आल्यास पंजाब राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात येईल . याच आश्वासनाची पुर्तता करत पंजाबचे मुख्यमंत्री भागवंत मान यांनी करुन दाखवून दिली व राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्ताने जुनी पेन्शन योजना लागु करण्याची मोठी घोषणा केली व2004 नंतर जे कर्मचारी पंजाब शासन सेवेत रुजु झालेले आहेत त्याचबरोबर जे कर्मचारी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सेवानिवृत्त झालेले आहेत . अशा कर्मचाऱ्यांना देखिल जुनी पेन्शन प्रमाणे इतर सर्व लाभ लागु करुन जुनी पेन्शन योजना लागु करण्याची घोषणा केली आहे . या निर्णयाचे पंजाब राज्य कर्मचाऱ्यांकडुन कर्मचारी यांनी जोरदार स्वागत केले आहे देशातील बहुतांश राज्यांनी जुनी पेन्शन योजनाच लागु केली आहे ईतर राज्याच्या व पंजाब सरकारच्या धर्तीवरच महाराष्ट्र सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करून कर्मचार्यांना लाभ द्यावे ही मागणी महाराष्ट्राभर जोर धरत आहे राज्यभरात अनेक आंदोलने होत आहेत व राज्य कर्मचार्यामध्ये तिव्र नाराजी असल्याची माहिती शिक्षक आघाडीचे अनिल आयस्कार यांनी पञकारांशी बोलतांना दिली
Users Today : 22