प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार-:मालकी हक्क असलेल्या जागेवर वीज कंपनीने भाडयाने कार्यालय घेतले . न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यालय खाली करण्यास गेलेल्या जागा मालकासह त्यांच्या मुलाला डांबुन ठेवत अनधिकृतपणे जागेचा ताबा घेतल्याप्रकरणी तसेच जीवे ठार मारल्याप्रकरणी वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांसह तीन जणांविरूध्द फसवणूक व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीस सुत्रांनुसार , नंदुरबार येथील व्यापारी मदनलाल लालचंद जैन यांच्या मालकीची जागा व कार्यालय बसस्थानका समोरील सर्व्हे क्रमांक २५१ अ २ वर आहे . तेथे वीज कंपनीने भाडयाने कार्यालय घेतले आहे . याबाबत न्यायालयात प्रकरण गेले होते . न्यायालयाच्या आदेशान्वये जैन व त्यांचा मुलगा भावेश हे न्यायालयाचे बिलीफ व मंजुरांना घेवून कार्यालय खाली करण्यासाठी दि . १४ जून २०२२ रोजी गेले होते . त्यावेळी बारसे व इतर दोघांनी त्यांना न्यायालयाचे खोटे ई मेल हे खरे असल्याचे दाखविले . जागा खाली करण्याच्या कामात अडथळा आणला व दिशाभूल केली तसेच जैन पिता पुत्रांना ठार मारण्याची धमकी देवून त्यांना डांबून ठेवले बंद करा हा तमाशा सांगून आरडाओरड केली . दरम्यान मनदलाल जैन यांनी याबत तब्बल चार महिन्यानंतर पोलीसांत फिर्याद दिली . त्यावरून ए . ए . बोरसे , अधिक्षक अभियंता , वीज कंपनी , संजय मुरलीधर पाटील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता व राहुल सिन्ना मुंबई यांच्याविरूध्द फसवणूक व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास निरीक्षक किरणकुमार खेडकर करीत आहेत .
Users Today : 100