प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार-:योजनांची प्रभावी अमंलबजावणी व्हावी यासाठी येत्या मार्च २०२३ पर्यंत सुमारे एक लाख पदांची भरती करण्यात येणार असल्याचे राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ . विजयकुमार गावित यांनी सांगितले . नंदुरबार जिल्हा परिषदेतील नवनियुक्त अध्यक्षांच्या दालनाच्या पुजेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते . यावेळी पालकमंत्री डॉ . गावीत म्हणाले , रिक्त पदांचा प्रश्न नंदुरबार जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात आहे . यासाठी शिंदे – फडणवीस सरकारने डिसेंबरपर्यंत एक लाख पदे भरण्याचा निर्णय घेतला होता . मात्र काही अडचणी आल्याने आता मार्चपर्यंत सुमारे १ लाख जागा भरल्या जातील . त्यामुळे रिक्त असलेली ८० ९ ० टक्के पदे भरले जातील . यामुळे जिल्ह्यातील रिक्त पदे देखील भरली जाणार आहेत . केंद्रासह राज्यातून विकासासाठी जिल्ह्यात किती पैसा येतो , त्यापेक्षा योग्य नियोजन करुन खर्च करणे अपेक्षित असल्याचे यावेळी डॉग़ावित म्हणाले . आगामी काळात येणाऱ्या निधीत दऱ्या – खोऱ्यातील , वाड्या वस्तीतील रस्ते या कामांना प्राधान्य देण्यात येईल . जिल्ह्यात शेतकरी , बेरोजगार , बचत गटांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत . त्यासोबत जिल्ह्यात बांबू , तेंदूपत्ता आदी उत्पादना बाबत सर्वेक्षण केले जात असून जिथे पिकते तेथेच प्रोसेसिंग युनिटची स्थापना करण्याचा प्रयत्न आहे . त्यामुळे स्थलांतराचे प्रमाण कमी होणार आहे . जिल्ह्यात ९ ० टक्के स्थलांतर हे सिंचनाअभावी होतांना दिसत आहे . त्यासाठी सिंचनासाठी प्रयत्न करणार असून जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक भागात काय हवे यासाठी प्रत्येक गावांचा आराखडा आखला जात असल्याचे मंत्री डॉ . विजयकुमार गावित यांनी सांगितले .
Users Today : 100