प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार-:शहरातील मिराज सिनेमामागे ऊसनवार पैशांच्या वादातून एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या बाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नंदुरबार शहरातील तेलीवाडा येथील संदिप सुदाम चौधरी यांनी मंगला गणपत चौधरी यांच्याकडून दोन वर्षापूर्वी दोन लाख रुपये घेतले होते . सदर ऊसनवार पैशांच्या वादातून संदिप चौधरी यांना मंगला गणपत चौधरी , योगेश उर्फ मोंटू गणपत चौधरी , भूषण गणपत चौधरी , विक्की उर्फ बालाजी गणपत चौधरी , रविंद्र छबुलाल चौधरी यांनी मारहाण केली . तसेच खोट्या केसेसमध्ये अडकविण्याची धमकी दिली . या बाबत संदिप चौधरी यांच्या फिर्यादी वरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात भादंवि कलम १४३ , १४७ , १४ ९ , ३२३ , ५०४ , ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास पोना.इसमल पावरा करीत आहेत .
Users Today : 100