दुचाकीची अॅपेरिक्षाला धडक ; तरुणीचा मृत्यू तर एक युवती जखमी

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार-:तालुक्यातील ढंढाणे गावाजवळ दुचाकीने अॅपेरिक्षाला धडक दिल्याने अॅपेरिक्षा घडलेल्या अपघातात तरुणीचा मृत्यू झाला तर एक युवती जखमी झाल्याची घटना घडली .       याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .   याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नंदुरबार तालुक्यातील ढंढाणे गावाजवळील रनाळे ते शनिमांडळ टी पॉईंटजवळील रस्त्यावर साहेब काशिनाथ ठाकरे रा . ढंढाणे ता . नंदुरबार याने त्याच्या ताब्यातील दुचाकी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात दुचाकी चालवून समोरुन येणाऱ्या अॅपेरिक्षाला ( क्र.जी.जे. ०८ एव्ही ३ ९ ७७ ) जबर धडक दिल्याने अॅपेरिक्षा उलटल्याने अपघात घडला . घडलेल्या अपघातात आनंदी सोमा पाडवी ( वय १ ९ , रा . ढेकवद ता . नंदुरबार ) ही तरुणी गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला .   तर नंदिनी सोमा पाडवी ( वय १५ , रा . ढेकवद ता . नंदुरबार ) ही युवती जखमी झाली . अपघातात ॲपेरिक्षाचे नुकसान झाले असून अपघातानंतर दुचाकी चालक घटनास्थळावरुन पसार झाला .  या बाबत सोमा बाज्या पाडवी यांच्या फिर्यादी वरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात साहेब ठाकरे याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ ( अ ) , २७ ९ , ३३७ , ३३८ , ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ , १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पुढील तपास पोहेकॉ . नरेश गुरव करीत आहेत .

0 9 4 9 2 8
Users Today : 100
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *