प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार-:नंदूरबार येथील १७ वर्षीय युवक अस्तंभा शिखरावर दर्शनासाठी पायी गेला होता . परत शिखरावरुन उतरत असतांना बाटेत मामा भाचा टेकडीवरून पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे . या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , नंदूरबार शहरातील लहाण माळीवाडा भिलाटी येथे राहणारा गणेश सुरेश वळवी ( १७ वर्षे ) हा अस्तंभा यात्रे निमित्ताने धडगाव तालुक्यातील अस्तंभा गावी अस्तंभा शिखरावर दर्शनासाठी पायी गेला होता . दर्शन घेऊन परत शिखरावरुन उतरत असतांना बाटेत त्यांचा मामा भाचा टेकडी वरून पाय घसरल्याने गणेश वळवी हा दरीत कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला . त्याचे प्रेत खोल दरीत असल्याने पोलिसांनी त्याचा शोध घेतला २३ ऑक्टोंबर सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली . या प्रकरणी ईश्वर रुपसिंग वळवी वय २८ वर्षे , धंदा मजुरी रा . लहाण माळीवाडा भिलाटी , नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून धडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . याप्रकरणी पुढील तपास पोसई राहुल पाटील करीत आहेत .
Users Today : 100