सर्व पक्षांच्या सदस्यांना सोबत घेवून जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध : जि.प. अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार-:नंदुरबार जिल्हा परिषदेत काम करतांना भेदभाव न करता सर्व पक्षांच्या सदस्यांना सोबत घेवुन जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील . कुपोषण , स्थलांतर , आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी कटीबध्द राहणार . योजनांची प्रभावी अमंलबजावणी व्हावी यासाठी दरमहा आढावा बैठक घेणार असून वैयक्तिकरित्या प्रत्येक योजनेवर लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी केले.नंदुरबार जिल्हा परिषदेतील नवनियुक्त अध्यक्षांच्या दालनाच्या पुजेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला .   जि.प.च्या नवनियुक्त अध्यक्षा डॉ . सुप्रिया गावित यांच्या दालनाची जि.प.सदस्या डॉ . कुमुदीनी गावीत यांच्याहस्ते पुजा आली . यावेळी करण्यात पालकमंत्री डॉ . विजयकुमार गावीत , खा . डॉ . हीना गावीत , भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी , माजी आ . शिरीष चौधरी.जि.प.सभापती हेमलता शितोळे आदी उपस्थित होते .    यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना डॉ . सुप्रिया गावित म्हणाल्या , जिल्हा परिषदेतील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतीलग़रज असेल तेथे दुरुस्ती करून नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल . जिल्ह्यातील कुपोषण , रस्ते यासोबतच शाळा व अंगणवाड्यांच्या कामांना प्राधान्य देत जिल्हा परिषदेमध्ये काम करतांना सर्व पक्षीय सदस्यांची कामे केली जातील . कोणताही भेदभाव न करता कामे करण्यात येतील . जिल्ह्याचा विकासाला प्राधान्य देवुन नागरीकांच्या मुलभुत समस्यांसोबतच शिक्षणाच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे .   जिल्हातील सर्व गावांना समान न्याय मिळवून त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कटीबध्द असुन प्रत्येक कामाचा आढावा घेवून योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ . सुप्रिया गावित यांनी सांगितले.   तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईदेखील प्रस्तावित येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .

 

0 9 4 9 2 8
Users Today : 100
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *