कुपोषण रोखण्यासाठी स्थलांतरीतांचे मॅपिंग होणार : खा .डॉ. हीना गावित

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार-:जिल्ह्यातील कुपोषण रोखण्यासाठी स्थलांतर थांबणे गरजेचे आहे . यासाठी जिल्हा परिषदेद्वारे स्थलांतरीतांचे मॅपिंग करण्यात येणार आहे असे खा . डॉ . हीना गावित यांनी सांगितले . नंदुरबार जिल्हा परिषदेतील नवनियुक्त अध्यक्षांच्या दालनाच्या पुजेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलात्या वेळी त्या बोलत होत्या .    यावेळी खा . डॉ . हीना गावित म्हणाल्या की , जिल्ह्यातील कुपोषण रोखण्यासाठी स्थलांतर थांबणे गरजेचे आहे .    यासाठी जिल्हा परिषदेद्वारे स्थलांतरीतांचे मॅपिंग केल्यास स्थलांतर होणाऱ्या ठिकाणच्या अंगणवाडींमधून संबंधित बालकाला पोषण आहार पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील .    केंद्र सरकारच्या योजनेतून जिल्हा परिषदेसाठी मोठा निधी आणला जाईल . केंद्र सरकारकडून विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी निधी देण्यात कधीच हात आखडता न करता मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला जात असल्याचे सांगितले . जिल्ह्यातील प्रत्येक गावात आवश्यक मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात , यासाठी प्रत्येक गावाचा आराखडा तयार करण्यात येत आहे .    त्यामुळे सर्व गावांना समान न्याय मिळवून त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण होणार असल्याचे खा . डॉ . हीना गावित यांनी सांगितले .

0 9 4 9 2 8
Users Today : 100
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *