प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार-:कोरोनामुळे २ वर्षांनंतर संपूर्ण देश मोठ्या उत्साहात दिवाळी साजरा करीत असताना नंदुरबार पोलीसांनी दिवाळीत अनाथांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले आहे .
पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून अनाथ मुले व गरीब परित्यक्ता महिला यांच्यासोबत मिठाईसह या अनाथ मुलांना कपडे व परित्यक्ता महिलांना साड्या देऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करुन नंदुरबार पोलीसांनी दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे . तळागाळातल्या घटकांसोबत आपला आनंद वाटल्यांने तो दुप्पट झाल्याचे समाधान या पोलीसांच्या एरव्ही कडक वाटणाऱ्या चेहऱ्यावर दिसत होता तर दुसरीकडे पोलीसांची ही वेगळी प्रतिमा या अनाथ मुलांच्या व परित्यक्ता महिलांच्या चेहऱ्यावरील आनंदात ठळकपणे दिसत होती . या अनाथ मुलांनीही रिटर्न गिफ्ट म्हणून पोलीसांना स्वतःच्या हाताने बनवलेली भेटकार्ड भेट दिली . कागदाच्या पुठ्यांवर स्वःताच्या हाताने बनवलेली ही भेटकार्डे या दिवाळीची सर्वात अनमोल भेट असल्याचे व रिटर्न गिफ्ट देण्याची या मुलांची भावना त्याहून अनमोल असल्याचे नंदूरबारचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सांगितले . पोलीस अधीक्षक कार्यालयात ही भेटकार्ड लावण्यात येणार आहेत . यावेळी कार्यक्रमला उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण खेडकर , अकलकुवा पोलीस निरीक्षक आगरकर , नंदुरबार तालुका पोलीस निरीक्षक राहूल पवार , पोलीस निरीक्षक अर्जुन पटले , शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर , म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार , उपनगरचे पोलीस निरीक्षक बधाणे आदी उपस्थीत होते
Users Today : 100