ध.दि. रहाटे शिक्षण व बहुउद्देशीय संस्था अंतर्गत राजश्री ग्लोबल स्कूल मेहकर येथील विद्यार्थिनी कुमारी हर्षदा खोकले ,साक्षी भिसे ,आचल धोटे यांची वयोगट 16 मध्ये चेन्नई येथे होणाऱ्या फ्लोवर बॉल स्पर्धेसाठी राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. . त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार श्री.प्रतापराव जाधव साहेब, संचालिका राजश्रीताई जाधव ,सचिव श्री ऋषी भाऊ जाधव, ग्लोबल स्कूलच्या प्राचार्य सरिता खंडेलवाल, उपप्राचार्य प्रवीण गावंडे, प्रशासक मनोहर म्हळसने यांनी खूप खूप कौतुक केले व राष्ट्रीय पातळी स्पर्धेसाठी विद्यार्थिनींना हार्दिक शुभेच्छा दिल्या. सर्व विद्यार्थिनींना या स्पर्धेसाठी पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम निळे सर(अध्यक्ष बुलढाणा फ्लोअर बॉल असोसिएशन आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू) क्रीडा शिक्षक रवीकुमार लोखंडे व व्यवस्थापक सिद्धार्थ जाधव ,विद्या मुळे यांचे सहकार्य लाभले.
Users Today : 16