चिखली ज्यांच्या स्पर्शाने या मराठी मातीतल्या गवताला भाले फुटले आणि ज्यांच्या एका शब्दावर मराठी मन पेटून उठले त्या छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा चिखली शहरात आपण सर्व जण मिळून उभारणार आहोत. हा पुतळा येणार्या अनंत पिढ्यांना स्वराज्यासाठी लढण्याची प्रेरणा देत राहील.स्वराज्य संस्थापक, बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आपल्या शहरात बसवावा ही आपल्या सर्वांची मनातून इच्छा आहे. वेळोवेळी ही इच्छा आपण जाहीररीत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रगट केली आहे. आता वेळ आली आहे ही इच्छा पूर्ण करण्याची. आपल्या सर्वांच्या मागणीनुसार मी शिवरायांच्या विचारांची पाईक व एक शिवभक्त म्हणून पाठपुरावा केला आणि त्यायोगे हे पुण्यकर्म मार्गी लावण्यासंदर्भात शासनाचा अधिकृत संदेश प्राप्त झाला आहे. आता गरज आहे हे शिवकार्य सुरू करण्यासाठी जात, धर्म, पंथ, पक्ष सोडून एकत्र येण्याची व विविध सामाजिक, आर्थिक, शासकीय बाबींवर चर्चा करण्याची आणि पुढील मार्ग ठरवण्याची. त्यासाठी माझी विनंती आहे की समाजातील सर्व शिवप्रेमींनी दि. 28 ऑक्टोबर, शुक्रवार रोजी सकाळी ठिक 11 वाजता मौनी बाबा संस्थान, चिखली येथे उपस्थित रहावे.आपण सर्व मिळून आपले पद, प्रतिष्ठा, पक्ष, धर्म विसरून फक्त शिवभक्त म्हणून एकत्र येऊ आणि हे शिवकार्य पूर्णत्वास नेऊया…!
बैठकीचा तपशीलः
दि. 28 ऑक्टोबर 2022.
वेळः सकाळी 11 वाजता.
स्थळः मौनी बाबा संस्थान, चिखली.
Users Today : 16