धर्मवीरपुत्र युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्यामुळे करडी येथील युवकाला वेळेवर उपचार मिळाल्यामुळे डोळा निकामी होता-होता वाचला..!

Khozmaster
2 Min Read

बुलडाणा 26/10/2022 रोजी रात्री ठीक – 11.30 – 12 च्या सुमारास धाड येथील श्री वैभव सोनुने यांच्यासह काही धर्मवीर आ. श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे फोन युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड यांना आले, त्यांनी सांगितले की करडी येथील श्री विजय कडुबा शिवणकर. वय – 22 या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये फटाक्याची आतिषबाजी करताना बारूद गेल्यामुळे गंभीर स्वरूपाची ईजा होऊन त्यांना गंभीर दुखापत झाली आहे,अशी कल्पना दिली तसेच त्यांना बुलडाणा येथे कोणत्याही हॉस्पिटलमध्ये घेत नसल्याचे सांगितले त्यानंतर युवानेते मृत्युंजय गायकवाड यांनी ताबडतोब त्यांना बुलडाणा येथील डोळ्याचे श्री जोशी हॉस्पिटल येथे पेशंटला घेऊन येण्याचे सांगितले, त्यानंतर तेथील कार्यकर्ते श्री विजय शिवणकर यांना तेथे घेऊन आले, मुलेमृत्युंजय गायकवाड यांनी ताबडतोब डोळ्याचे प्रसिद्ध सर्जन श्री डॉ. सुभाषजी जोशी यांना कॉल केला असता डॉक्टर साहेब कामानिमित्याने बाहेर होते, परंतु डॉक्टर साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांचे काम सोडले आणि आपले हॉस्पिटल गाठले, तोपर्यंत मृत्युंजय गायकवाड तसेच सर्व कार्यकर्ते पेशन्ट सोबत तेथे हजर होते, त्यांना ताबडतोब ऑपरेशन रूम मध्ये घेण्यात आले, त्यावेळी मृत्युंजय गायकवाड उपचार करतांना तेथेच हजर होते, डॉक्टर साहेबांनी वेळीच उपचार सुरु केल्यामुळे श्री विजय शिवणकर यांचा डोळा निकामी होता-होता वाचला, त्यानंतर सर्व धाड परिसरातील कार्यकर्त्यांनी युवानेते श्री मृत्युंजय संजय गायकवाड यांचे तसेच डॉ. श्री सुभाष जोशी सर यांचे मनापासून आभार मानले, यावेळी सोबत ज्ञानेश्वर खांडवे, सचिन कोठाळे, तसेच धाड परिसरातील धर्मवीर आ. श्री संजुभाऊ गायकवाड यांचे निष्ठावंत समर्थक उपस्थित होते….!!!!

 

0 9 4 6 6 6
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *