विमाभरपाई बिड पॅटर्न नुसार द्या _विष्णुपंत भुतेकर

Khozmaster
1 Min Read

राज्य सरकारने या वर्षां पासुन पीकविमा भरपाई हि बिड पॅटर्न पध्दतीने देणार आसल्याचे मान्य केले होते. बिड पॅटर्न 80 -110 नुसार राबविला जातो. नुकसान जास्त असल्यास नुकसान भरपाई 110 टक्के देण्याची या पॅटर्न मधे तरतुद आहे. राज्यात विमा कंपन्याकडुन याच पध्दतीने पीकविम्याचा मोबदला मि॓ळणे आपेक्षीत आहे. जास्तीची लागणारी रक्कम केंद्र व राज्य सरकार भरेल आशा प्रकारची तरतुद बिड पॅटर्न मधे आहे. नैसर्गीक आपत्ती नसेल त्या काळात नफा म्हणून कंपनी एकुण रक्कमेच्या 20% रक्कम स्वतः कडे

ठेवेल तर 50% रक्कम शेतकऱ्यांना वाटप केली जाईल व उरलेली 30% रक्कम त्या- त्या जिल्ह्य़ातील शेतकर्यांच्या विकासासाठी सरकार कडे जमा केली जाईल. पंरतु ज्या वेळेस शेतकऱ्यांचे नुकसान जास्त आसेल तेंव्हा शेतकऱ्यांना 110% टक्के मदत वाटप करण्याचे बंधन आहे. या वर्षी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे विमा भरपाई हि बिड पॅटर्न नुसार 110 टक्केच मिळायला हवी. शासनाने आणि सरकार मधे बसलेल्या अनेकांनी बिड पॅटर्न राबविण्यात येईल याची ग्वाही दिली होती. याचा विसर पडता कामा नये याची जाणीव भूमिपुत्र शतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी प्रसिद्धी पत्राव्दारे करून दिली आहे .

0 9 3 7 2 0
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *