दिवाळीची संध्याकाळ सैनिंकाच्या नांवे करणारा समाजसेवक हर्षल साबळे

Khozmaster
1 Min Read

मुर्तिजापुर (भुषण महाजन) :- सतत १५ वर्षांपासून सामाजिक नावीन्य उपक्रम राबविणारे समाजसेवक व भाजपा युवा मोर्चाचे मुर्तिजापुर शहर अध्यक्ष हर्षल साबळे त्यांच्या निराळया शैलीतून दिवाळी साजरा करतात. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा घरी येणाऱ्या जवानांना जाऊन भेटून त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करण्यात येते. “नमो नमो मित्र परिवार “मूर्तिजापूर च्या वतीने दिवाळी साजरी भारतीय सैन्य दलातील कार्यरत असलेले सैनिक सागर रघुनाथ इंगळे राहणार हिरपूर यांच्या घरी जाऊन शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या सोबत यंदाची दिवाळी साजरी करण्यात आली.याच प्रमाणे आपण सुद्धा आपल्या परिचित आपल्या जवळच्या गावात शहिदांच्या परिवारा सोबत,तसेच घरी आलेल्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी करावी असे मत हर्षल साबळे यांनी व्यक्त केले.

0 9 4 7 8 4
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *