तेल्हारा प्रतिनिधी रितेश कुमार टीलावत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वर्ग अकरावी व बारावी वाणिज्य शाखेच्या सहदेवराव भोपळे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गाडगेबाबांची दशसूत्री मधील तिसरे सूत्र याचा अवलंब करत गरजू लोकांना कपड्यांचे वाटप करून नवीन आदर्श निर्माण केला आहे. “साजरी करूया गरजूंची दिवाळी” या उपक्रमांतर्गत गरजूंची दिवाळी आनंदीत जावी व त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी भोपळे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गरजूंना कपडे वाटप करून त्यांच्या दिवाळीत आनंद भरण्याचा प्रयत्न प्रयत्न केला आहे. कपड्यांचे संकलन करण्याकरिता दर्शन खीरोडकार, विराज खीरोडकार, वंश बाजारे, तुषार परिस्कर, ऋषिकेश साबळे, हर्षा बाभुळकर, वैष्णवी रहाटे, कार्तिकी आडोळे, पायल झगडे, शीतल इंगळे, पल्लवी घाटे, वैष्णवी हागे श्रुतिका नाठे, वैष्णवी इंगळे, यांनी केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे सहकार्यवाह माननीय श्री श्यामशीलजी भोपळे, प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय श्री मनीषजी गिर्हे केंद्रप्रमुख हिवरखेड, माननीय श्री प्रकाश जी गावंडे पोलीस पाटील हिवरखेड, वासुदेवजी वाघ सामाजिक कार्यकर्ता, बाळासाहेब नेरकर कर्मयोगी गाडगेबाबा सेवा संस्था, माननीय श्री धैर्यशील भोपळे, एडवोकेट कौंतेय भोपळे, प्राध्यापक कौस्तुभ भोपळे गजाननभाऊ राठोड, पर्यवेक्षक श्री स्नेहल भोपळे सर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी वर्ग अकरावी बारावी वाणिज्य शाखेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी डॉक्टर मयूर लहाने वाणिज्य शाखाप्रमुख सहदेवरावभोपळे कनिष्ठ महाविद्यालय हिवरखेड यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा सोनटक्के, श्रुति माणिक यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्रेया कवळकार यांनी केले.
Users Today : 25