तेल्हारा प्रतिनिधी रितेश कुमार टीलावत तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील शेतकरी दरवर्षी काहीतरी नवनवीन प्रयोग आपल्या शेतीत करून चांगले उत्पादन प्राप्त करतात. त्यातूनच सोयाबीन, कापूस, उडीद, मुंग या पारंपारिक पिकांपासून योग्य ते उत्पन्न मिळत नसल्याने हिवरखेड येथे बुलढाणा अर्बन बँकेत शाखाधिकारी या पदावर कार्यरत असलेले रामदास भालेराव यांनी आपल्या शेतात झेंडूच्या फुलांची शेती केली आहे. दिवाळी पासून झेंडूच्या फुलांना चांगली मागणी मिळण्याची आशा आहे.रामदास भालेराव यांनी आपल्या दानापूर येथील शेतात यावर्षी झेंडूच्या झाडांची लागवड केली. त्यातून ते चांगला उत्पन्न मिळवत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकावर अवलंबून न राहता आपल्या शेतात फळपीक किंवा फुल शेती करण्यावरही भर द्यावा जेणेकरून त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल असे मत यावेळी रामदास भालेराव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिले. परिसरात अल्पभूधारक शेतकरी मुंग, उडीद ही कमी वेळेत व कमी खर्चात येणारे पिके घेतात. मात्र जास्त पावसामुळे तोंडाशी आलेले पीक जात असल्याचे अनुभव आलेले असताना आता पारंपारिक शेती सोबतच फुल शेती वर शेतकऱ्यांनी भर द्यावा व कृषी विभागाने सुद्धा शेतकऱ्यांना याबाबतीत मार्गदर्शन करावे अशी मागणी परिसरातून शेतकरी करीत आहेत. अनेक वर्षापासुन या परिसरात सोयाबीन, उळीद, मुंग, कपाशी अशी पिके पेरणी केली जात आहे त्या सोबतच शेतकऱ्यांनी आपल्या शेतात फुल शेतीवर भर द्यावा जेणेकरून उत्पादनात वाढ होईल व त्याकरिता कृषी विभाग तेल्हारा मार्फत योग्य ती सल्ला व मार्गदर्शन मिळेल
महेश इंगळे कृषी सहाय्यक
Users Today : 21