मुस्लिम समाजामध्ये आदर्श घडवला.

Khozmaster
1 Min Read

मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील रहिवाशी जुम्मा शाह यांच्या मुलांनी मुस्लिम समाजात एक दिशा देण्याचे काम केले एकीकडे एम बी बी एस सारख्या वैद्यकीय शिक्षणाला नंबर लागणे खूप मोठी गोष्ट असतांनाच दुसरीकडे दोन्ही मुलांनी आदर्श घडवत एम बी बी एस साठी शासकीय कोठ्यातून नंबर लागला.    2020 मध्ये रफिक शाह जुम्मा शाह याचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे एम बी बी एस साठी नंबर लागला तर लहाना मुलगा शफिक शाह जुम्मा शाह याचा नंबर आय आय एम एस आर वैद्यकीय महाविद्यालय बदनापूर येथे नंबर लागला एकाच वेळी दोन्ही मुलाचे एम बी बी एस साठी शासकीय कोठ्यातून प्रवेश मिळणे खूप कठीण गोष्ट असून ती गोष्ट जुम्मा शाह यांची सचोटी आणि मुलांना दिलेल्या संस्कारातून साकार झाली. जुम्मा शहा यांनी आपल्या जीवनात वाहन चालवून एका चालकाची भूमिका निभावत असताना घरगृहस्तीचे वाहन सुद्धा यथोचित मार्गावर चालविले त्यांच्या अपार परिश्रमाचे महत्त्व जाणून मुलांनी सुद्धा यश प्राप्त केले तर मुलांनी वडिलांच्या कष्टाची चीज करत अथक परिश्रम घेऊन आज मुस्लिम समाजापुढे आदर्श निर्माण केले.

 

0 9 4 6 7 1
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *