चिखली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी बैठक संपन्न

Khozmaster
3 Min Read

चिखली: हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा चिखली शहरात असावा अशी बऱ्याच दिवसांपासून मागणी शिवप्रेमीची मागणी सुरू होती . चिखली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींचा पुतळा हा उभा पुतळा असून त्या पुतळ्या ऐवजी त्याच ठिकाणी भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी चिखली शहरातील सर्व पक्षीय नागरिकांची बैठक होऊन चिखली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा असा एक मुखाने ठराव घेण्यात आला आणि त्यास सर्वांनी मान्यता दिली.

  आ. सौ. श्वेता ताई महाले पाटील यांची समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड

 

चिखली शहरांमध्ये जिल्हा बुलढाणा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आलेला आहे. सदर पुतळा खूप वर्षापूर्वी बसविण्यात आलेला आहे. सदर छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्या ऐवजी त्याठिकाणी भव्य अश्वारूढ बसविण्यात यावा अशी शिवप्रेमी जनतेची मागणी प्रमाणे शहरातील सर्व पक्षीय नागरिकांची मौनी महाराज मठ याठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती. अश्वारुढ पुतळा बसविण्यासाठी पुतळा समिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी समिती गठीत करण्याचे सुद्धा यावेळी ठरले . सदर समितीच्या अध्यक्ष पदी चिखली विधान सभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

 

पुतळा समितीचे लवकरच गठण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्या शिवप्रेमींची मागणी लक्षात घेता चिखली शहरांमध्ये उभारण्यात येणारा शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळ्यासाठी आमदार सौ श्वेता ताई महाले यांची एक मताने अध्यक्षपदी निवड झालेली आहे . परंतु समितीमधील उर्वरित सदस्यांची नियुक्ती अजून पर्यंत झालेली नाही . यासाठी ज्यांना ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी झोकून देवून काम करायचे आहे अशा वव्यक्तींची या समितीमध्ये निवड करावी असे सुद्धा सर्व पक्षी बैठकीमध्ये ठरविण्यात आले आहे. यासाठी ज्या इच्छुक शिवप्रेमींना या पुतळा समितीमध्ये काम करण्याची इच्छा आहे त्यांनी सचिन बोंद्रे यांच्याकडे आपली नावे देण्यात यावी असे सुद्धा या बैठकीत ठरविण्यात आले आहे.

अश्वारुढ पुतळ्यासाठी पहिल्याच बैठकीत ३१ लक्ष रूपयांचा निधी संकलित

 

चिखली शहरात बसविण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा भव्य दिव्य असावा यासाठी शिवप्रेमींकडून लोक वर्गणी उभारावी असे सुद्धा या बैठकीत ठराव मांडण्यात आला . या ठरावास चिखली शहरांमध्ये सदर बैठकीस उपस्थित शिवप्रेमींनी उदंड असा प्रतिसाद देऊन पहिल्याच बैठकीमध्ये 31 लक्ष रुपयांचा निधी संकलित करण्यात आला .

 

चिखली शहरातील प्रत्येक घरासोबतच ग्रामीण भागातील शिवप्रेमीना सुद्धा देणगीसाठी आवाहन करणार

 

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्राची अस्मिता. अठरा पगड जातींच्या लोकांना सोबत घेउन त्यांनी सर्व समाज एकत्र करुन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली होती.

छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी कधीही जाती धर्म भेद केला नाही . त्यामुळे चिखली शहरात त्यांचा होणारा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा हा सर्व जाती धर्माच्या लोकांची अस्मिता व्हावी यासाठी प्रत्येक चिखली शहर चिखली ग्रामीण तालुक्यातील प्रत्येक घर प्रत्येक व्यक्तीकडून सहभाग असावा म्हणून पुतळ्यासाठी देणगी मिळावी यासाठी समिती आग्रही असणार आहे . त्यासाठी पुतळा समितीच्या वतीने कमीत कमी 100 इतक्या कमी रुपयांची पावती छापणार असून प्रत्येक घरातून पावती घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणी कामात आपला खारीचा वाटा उचलण्याची विनंति करणार आहे.

0 9 4 6 7 1
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *