सतिश मवाळ हिवरा आश्रम बुलढाणा जिल्ह्यातील सामाजिक सेवेत सक्रिय सहभागी असलेले आणि राष्ट्रीय कार्यात मानवता वादी विचाराचे प्रचार प्रचारक ज्यांना आतापर्यंत जिल्हा स्तरापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध संस्था परिषद विद्यापीठ यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे याचे कार्य दिव्यांग शिक्षण, व्यसनमुक्ती, कोरोना योद्धा, सामूहिक विवाह, राष्ट्रीय एकात्मता, वृक्ष लागवड लागवड,संवर्धन व राष्ट्रीय कार्य इत्यादी सामाजिक कार्यात त्यांनी काम केले आहे.2022 ला कॉमन वेल्थ वोकेशनल आंतरराष्ट्रीय विद्यापीठ टोंगा यांनी मानद डॉक्टरेट(PH.D.) सोशल वर्क मध्ये देऊन त्यांना सन्मानित केले आहे. त्याचबरोबर त्यांना आंतरराष्ट्रीय असिया आयकॉन अवार्ड देऊन सन्मानित केले आहे नुकताच त्यांना डॉ. मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट पुणे डॉ रवींद्र भोळे अध्यक्ष यांनी त्याच्या सेवा कार्याची दखल घेऊन त्यांना सामाजिक कार्य आणि शैक्षणिक कार्यासाठी 2022 साठी भारतरत्न सरदार वल्लभ भाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार जाहीर केला असून सदर पुरस्काराचे वितरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन , स्टेशन जवळ पुणे .येथे माननीय नाम. चंद्रकांत पाटील पालकमंत्री पुणे आणि स्थानिक मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनांक 31ऑक्टोबर 2022 रोजी प्रदान करण्यात येणार आहे .सदर पुरस्कार सेवा कार्याचा गौरव म्हणून सामाजिक, शैक्षणीक , व मानवतावादी कार्याचा सन्मान म्हणून देण्यासाठी संस्थेचे सदस्य श्री सुभाष कट्यारमल दिव्यांग समाजसेवक पुणे यांनी कार्याची दखल घेऊन सदर नावाची शिफारस केली. गेल्या 40 वर्षापासून सामाजिक सेवेमध्ये अखंड पणे कार्यरत असलेले बुलढाणा जिल्ह्यातील कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराज यांच्या सेवाभावी संस्थेत प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले डॉ. पंढरीनाथ शेळके यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान झालेला आहे. त्यांचा आपल्या देशामध्ये सन्मान व्हावा या उद्देशाने विषय ट्रस्ट समोर ठेवला आणि पुरस्कार देण्यासाठी डॉ. पंढरीनाथ शेळके यांच्या नावाची निवड डॉ.रविंद्र भोळे अध्यक्ष व समितीने एकमताने केली.डॉ. मनीभाई देसाई हे मा पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे बंधू आहेत. त्यांच्या नावाने डॉ. मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट असून अनेक वर्षापासून राष्ट्रीय,सामाजिक, गो संवर्धन, वृक्ष संवर्धन अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे.उल्लेखनीय,राष्ट्रीय, सामाजिक,मानवतावादी, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती याचा सन्मान करणे,पुरस्कार देणे असे कार्य करीत आहे. सदर ट्रस्ट हा केंद्र शासन व निती आयोग सलग्न आहे.अशा ट्रस्ट चा पुरस्कार प्राचार्य डॉ पंढरीनाथ शेळके हिवरा आश्रम बुलडाणा यांना घोषित झाल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Users Today : 21