विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू, एक जखमी

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी

पातूर : अकोला – पातूर रोडवरील कॅनॉल रस्त्यावर जात असतांना एका ट्रकला हाय टेन्शन विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे.

आज दि.29 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास 33 केव्ही सबस्टेशन जवळील कॅनॉल रस्त्यावरून लाकडांचा माल भरण्यासाठी मजूर घेऊन जात असलेल्या ट्रक क्रमांक एम.एच.27 एक्स 5921 ला रस्त्याच्या आडव्या खाली लटकत असलेल्या हाय टेन्शन विद्युत तारांना स्पर्श झाल्याने ट्रक मध्ये असलेल्या शे.मुख्तार शे.महबूब (वय 42) रा.देवळी मैदान पातूर यांचा जागीच मृत्यू झाला असून शे.सलीम शे.मुसा (वय 50) हे जखमी झाले आहेत. दरम्यान मृतकास प्राथमिक आरोग्य केंद्र पातूर येथे आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित करून मृतकास शवविच्छेदनाकरीता सर्वोपचार रुग्णालया अकोला येथे पाठविले असून जखमीस पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविले आहे.

यावेळी पातूर पोलिसांनी पंचनामा करून मो.अख्तर मो.अनवर यांचे फिर्यादीवरून मर्ग क्र.41/22 कलम 174 दाखल केले असून पुढील तपास हे.कॉ.भास्कर इंगळे करीत आहेत.

0 9 4 7 8 4
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *