एक हात मदतीचा या अनुषंगाने पातूर तालुका विकास मंच कडून दिवाळी भेट निराधार विधवा महिलेच्या डोळ्यातील धुराचे अश्रू पुसण्यात यश..ठा.शिवकुमारसिंह बायस

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी

पातूर :- पातूर तालुक्यातील आगिखेड येथील रहिवासी असलेल्या श्रीमती कांताबाई तवंर यांचे मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे राहते घर कोसळले होते.

पातूर तालुका विकास मंचाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड पुणे येथील राजपूत समाज संघटनेच्या भरघोस अशा आर्थिक मदतीने या महिलेच्या स्वप्नातील घर आज साकारल्या जात आहे.घराचे ऐंशी टक्के काम पुर्ण झाले आहे उर्वरीत काम निधी अभावी रखडले आहे.

निराधार महिलेकडे स्वतःचे आधार कार्ड,पॅनकार्ड,बॅंकेचे खाते तसेच जागेचे असे कुठलेही कागदपत्रे काढलेली नसल्याने घरकुल योजनेचा निधी मंजूर करण्यासाठी अडचण येत होती.

पातूर तालुका विकास मंचाच्या माध्यमातून त्यांची सर्व कागदपत्रे संबंधित विभागातून काढून या निराधार महिलेचे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल प्रशासनाशी मोठे संघर्ष करून मंजूर करून देण्यात आले.शासनाचा निधी लवकर मिळाल्यानंतर उर्वरित राहिलेले घराचे काम करण्यात येणार आहे.

पातूर तालुका विकास मंचाच्या माध्यमातून श्रीमती कांताबाई तवंर यांना प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेंतर्गत गॅस जोडणी व त्याचे साहित्य मिळण्यासाठी काही महिन्यांपूर्वी त्यांच्या नावाची पातूर येथील आपले सरकार मध्ये ऑनलाईन नोदणी देवकर एच पी गॅस पाॅईंट येथे करण्यात आली होती.देवकर एच पी गॅस पाईंटचे संचालक दिलीप देवकर यांनी कुठल्याही प्रकारचे नोंदणी शुल्क न आकारता ते स्वतःच्या खिशातून भरत त्यांचे मुख्य वितरक असलेल्या मे गुरूमाऊली एच पी गॅस एजन्सी पिंपळडोली चे संचालक नितीन देशमुख यांच्या कडे यशस्वी पाठपुरावा केला व ते मंजूर करून घेतले व त्याचे वितरण त्यांच्या देवकर एच पी गॅस पाॅईंट पातूर येथे पातूर तालुका विकास मंचाचे पदाधिकारी किरणकुमार निमकंडे,रूस्तम गवई,मधूकर राखोंडे,विनोद तेजवाल रणजीत गाडेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

दिवाळीच्या काळात निराधार विधवा महिलेच्या डोळ्यातील धूरामुळे येणारे अश्रू पुसण्यासाठी सरपंच पूनम उगले,नितीन देशमुख,दिलीप देवकर,ठाकूर शिवकुमारसिंह बायस,किरणकुमार निमकंडे,विजय राऊत,विजय अत्तरकार,राहूल उगले,दिलीपसिंह बायस,सुरेश श्रीनाथ,साजीद सर,रामेश्वर वाडी, गणेश गाडगे,प्रमोद श्रीनाथ यांनी अथक परिश्रम घेतले.

0 9 4 7 8 4
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *