रितेश कुमार टीलावत
तेल्हारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखेडे यांनी यांच्या कार्यकाळात तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने विविध योजना व कार्यक्रम राबविले.ते पुढील प्रमाणे
माझे कार्यकाळात झालेली कामे, तालुक्यात 950 हेक्टर क्षेत्र फळबागा खाली आणले. तेल्हारा तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी संत्रा बेल्ट निर्माण केला.,मलचींग वरील टरबूज लागवडीस प्रोत्साहन घरचे
सोयाबिन बियाणे साठी शेतकऱ्यांत जनजागृती करून घरचे बियाणे राखून ठेवण्याची सवय लावली.बीजप्रक्रिया बाबत मोठ्या प्रमाणत मोहीम राबवून शेतकऱ्यांत जनजागृती केली.,करोना काळात जीवाची पर्वा न करता शेतकरयांना केळी, संत्रा, टरबूज मार्केट मध्ये विक्री साठी मदत केली.,पिक विमा कंपन्यावर वचक ठेऊन शेतकरयांना विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.,कृषी निविष्ठा विक्री बाबत सतर्क राहून दोन ट्रक पकडुन गुन्हे दाखल केले.मोठ्या प्रमाणात क्षेत्र ठिबक, मिनी स्प्रिंकलर, तुषार सिंचन खाली आणले,गुलाबी बोंड अळी बाबत जनजागृती मोहीम राबविली ,पोकरा PoCRA योजनेत न्याडेप युनिट बांधणी मोहीम स्वरूपात राबवून 100 पेक्षा जास्त युनिट पूर्ण केले.तेल्हारा तालुक्यातील हिंगनी ,सौदळा,तळेगाव ,खंडाळा,कोठा,आडगाव , चितलवाडी ,पाथर्डी , सांगवी,मालेगाव येथे राज्य पुरस्कृत कापूस पिकाची शेतीशाळा घेतली.पिकांची जोरदार वाढहोण्याकरिता शेतकऱ्यांनी बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करावी यावर जोर दिला.कृषी विभाग व आत्मा तर्फे तेल्हारा येथे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन.
शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना नेहमी प्रोत्साहन दिलेशेतकऱ्यांना बांधावर जावून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन केले खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी व स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी खरीप हंगामापूर्व कृषी संजीवनी मोहीम राबवली.
शेती व्यवसायास पूरक जोडधंदा म्हणून फलोत्पादन, संरक्षित शेती, भाजीपाला व फूल लागवड, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेततळ्यातील मत्स्यपालन, रेशीम, मधुमक्षिकापा व महिला सक्षमीकरण आदी कार्यक्रम राबविण्यात आले.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत विहीर पुनर्भरण शाश्वत उत्पादनासाठी फायदेशीर ठरत असल्याचे अनुभव यशस्वी केले.
सत्रा बागांचे पुनरुज्जीवन केल्यास उत्पादनात व दर्जात वाढ होते यामुळे सदर. योजना. बाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.शेवटी तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखेडे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना नेहमी प्रोत्साहन देण्याचे कार्य केले.त्यांच्या या कार्याला एकच प्रसिद्ध म्हण जुळते ,
मैं अकेला ही चला था ,जानिब-ए-मंज़िल मगर
लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया…..
Users Today : 22