रितेश कुमार टीलावत;अडगाव बु. येथील प्राथ, माध्य.आदिवासी आश्रम शाळा सलग्न डॉ जगन्नाथजी ढोणे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अडगाव बु येथे संस्थापक अध्यक्ष स्व.डॉ जगन्नाथजी ढोणे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.डॉ ढोणे साहेबांनी 1994 ला या शाळेचे छोटे रोपटे लावले होते आज या रोपट्याचा वटवृक्ष झाला असून परिसरातील च नव्हे तर वाशीम,अमरावती,अकोला बुलढाणा जिल्हातील आदिवासी विदयार्थी आपले कनिष्ठ महाविदयालयीन शिक्षण घेण्याकरिता या विदयालया मध्ये येत आहेत. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री संजय निमकर्डे यांनी आजपर्यंत यशस्वी विदयार्थ्यांच्या कामगिरीची माहिती दिली, त्याच बरोबर आदिवासी विदयार्थ्यांकरिता ज्ञानगंगा निर्माण करणारे, तरुणांना नोकरीच्या संधी देणारे, गरिबांना अन्न दान करणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे समाजभूषण डॉ ढोणे साहेब यांच्या जीवन पटाबद्दल विदयार्थ्यांना माहिती दिली, प्राथ. मुख्याध्यापक श्री अपाले सर यांनी साहेबाच्या कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन श्री राठोड सर तर आभार प्रदर्शन श्री तायडे सर यानी केले.